पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून चेष्टा

मुंबई तक

• 06:26 PM • 30 May 2026

Sanjay Rathore : आखाती देशातील युद्धाचा भडका जगभर पसरला आहे. याचपार्श्वभूमीवर भारताला देखील याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते मंडळींना आणि देशातील सर्वच राज्य सरकारला इंधन बचतीबाबत आवाहन केले, मात्र आता राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नरेंद्र मोदींचं आवाहन मोडित काढल्याचं दिसून येत आहे.

Sanjay Rathore

Sanjay Rathore

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आखाती देशातील युद्धाचा भडका जगभर

point

मंत्र्यांकडून इंधनाची उधळपट्टी

point

20 ते 22 वाहनांच्या ताफ्याचा जमाव घेऊन पाहणी दौरा

Sanjay Rathore : भास्कर मेहरे - आखाती देशातील युद्धाचा भडका जगभर पसरला आहे. याचपार्श्वभूमीवर भारताला देखील याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते मंडळींना आणि देशातील सर्वच राज्य सरकारला इंधन बचतीबाबत आवाहन केले, मात्र आता राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नरेंद्र मोदींचं आवाहन मोडित काढल्याचं दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी नागपूर ते पोहरादेवी असा हॉलिकॉप्टरने प्रवास केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बहिणीसोबत मुलाचे प्रेमसंबंध, भावासह साथीदारांनी संपवलं; मृतदेह गटारात...

मंत्र्यांकडून इंधनाची उधळपट्टी

पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय आणि विकासकामांची पाहणी केल्यानंतर, मंत्री राठोड एका खाजगी कार्यक्रमासाठी यवतमाळला देखील हेलिकॉप्टरनेच रवाना होणार असल्याची माहिती आहे. एकीकडे देशावर इंधन संकट सुरू असताना मंत्र्यांकडून इंधनाची उधळपट्टी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडून म्हणाला असा प्रतिसाद मिळत नाही. 

हे ही वाचा : मुलाने शेतात शौच केल्याने आईला रॉडने बेदम मारहाण, नंतर ग्रामस्थांकडून दगडफेक

20 ते 22 वाहनांच्या ताफ्याचा जमाव घेऊन पाहणी दौरा

दरम्यान, यावर बोलताना मंत्री संजय राठोड यांनी सारवासारव करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला मंत्र्यांनी तिलांजली दिली आहे. तब्बल 20 ते 22 वाहनांच्या ताफ्याचा जमाव घेऊन ते फिरत पाहणी दौरा करत मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.