uddhav thackeray slams nitin gadkari : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबले असून, त्यानंतर मुंबईत विद्यार्थ्यांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुंबईकरांनीही उपस्थिती लावली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रोहित पवार यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते या विजयोत्सवात सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण, त्यात सुद्धा भेसळ; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
एका झुरळाने हुकूमशहाला झुकवलं - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, "आज मी सर्वांचं केवळ अभिनंदन करत नाही, तर देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, मात्र अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात, पात, धर्म आणि पक्ष विसरून भारतीय आणि देशभक्त म्हणून सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं, एका झुरळाने हुकूमशहाला झुकवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना सांगा, देशाचं काम करा."
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्याला पाऊस झोडपणार, काही ठिकाणी यलो; तर कुठे रेड अलर्टचा अंदाज
स्ता मंत्री इथेनॉलवर बोलत आहेत, पुढचा विषय हाच - ठाकरे
केंद्रातील विविध मंत्र्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "अर्थमंत्री निर्मला सीतारामन घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, मात्र पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देशाच्या संरक्षणाऐवजी धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलत आहेत. हा यापुढचा विषय नक्की आहे. मोदींना मला सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदावरून काढताना वेदना झाल्या असतील. पण त्यापेक्षा जास्त वेदना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. त्या यातना आम्ही विसरणार नाही."
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हा संघर्ष पुढेही सुरू राहील, असे सांगितले. ते म्हणाले, "ही ठिणगी पडली आहे. देशभर वणवा पेटलाय. लगेच आम्हाला विचारतात की निवडणुकीला आणखी तीन वर्षे आहेत. निवडणुका खड्ड्यात गेल्या. कारण मोदींनी पाहिलंय, मत चोरी करता येते; मात्र माणसं चोरता येत नाहीत, मनं चोरता येत नाहीत. ही मनं आता पेटलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. सोशल मीडियावर काही अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ काढा आणि पोस्ट करा. सापडतील त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. ही भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधीकधी शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची ठरते. तुम्ही देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहिलं आहे. लोकशाहीच्या इतिहासात याची नोंद राहील."
ADVERTISEMENT












