धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

26 Jul 2026 (अपडेटेड: 26 Jul 2026, 10:56 AM)

devendra fadnavis first reaction on dharmendra pradhan resignation : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्यांनी घेतलेला निर्णय भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवले"

point

राष्ट्रहितासाठी दिलेला राजीनामा भाजप कार्यकर्त्याची ओळख : देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis first reaction on dharmendra pradhan resignation :केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचे काम धर्मेंद्र प्रधान यांनी केले असल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच पीएम श्री शाळा, आयआयटींचा परदेशात विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा 19 भाषांमध्ये विस्तार अशा अनेक सुधारणांमुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'महाराष्ट्राच्या पोरानं दिल्ली हादरवून ठेवली...' दिपकेंची सावलीसारखी साथ देणारा मित्र

धर्मेंद्र प्रधान यांना संपूर्ण भाजप परिवाराचा पाठिंबा - फडणवीस 

"धर्मेंद्र प्रधान यांनी व्यापक समाजहितासाठी असलेली आपली बांधिलकी सिद्ध करत आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राष्ट्रहिताला वैयक्तिक हितापेक्षा अधिक महत्त्व देणे हीच भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे." असं फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले. "समूचा भाजपा परिवार उनके साथ है," असे म्हणत फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांना संपूर्ण भाजप परिवाराचा पाठिंबा असल्याचेही सांगितले.

हेही वाचा : Inside Story: CM फडणवीसांना तडकाफडकी बोलावलं दिल्लीला, पण या मीटिंगची आतली कहाणी भलतीच!

राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, यासाठी राजीनामा - धर्मेंद्र प्रधान 

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 'NEET-UG' परीक्षेतील गोंधळावरून देशभरात निर्माण झालेला वाद आणि जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती देताना त्यामागील कारणही स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होऊ नये, या विचारातून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या संदेशात देशातील एकता कायम राहणे आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये, यालाच प्राधान्य दिल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांनी आंदोलन किंवा वादांमध्ये वेळ घालवण्याऐवजी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या उद्देशाने आपण माननीय पंतप्रधानांकडे राजीनामा पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जंतर-मंतरसह देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रहित आणि विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केले.