ठाणे : पॅरिसमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल असल्याचं सांगून 26 महिलांची फसवणूक; अनेकींवर बलात्कार

ठाणे: पॅरिसमध्ये आपलं फाइव्ह स्टार हॉटेल असल्याचं सांगून भोळ्याभाबड्या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि काही महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी एका भामट्याला ठाणे पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीने आतापर्यंत तब्बल 26 महिलांची फसवणूक केल्याचा त्याचावर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीने मुंबई, ठाणे परिसरातील महिल्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. मुंबईशिवाय आरोपीने केरळ, बंगळुरू, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:06 AM • 17 Dec 2021

follow google news

ठाणे: पॅरिसमध्ये आपलं फाइव्ह स्टार हॉटेल असल्याचं सांगून भोळ्याभाबड्या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि काही महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी एका भामट्याला ठाणे पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीने आतापर्यंत तब्बल 26 महिलांची फसवणूक केल्याचा त्याचावर आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीने मुंबई, ठाणे परिसरातील महिल्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. मुंबईशिवाय आरोपीने केरळ, बंगळुरू, कलकत्तासारख्या राज्यातील देखील काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचं आता उघडकीस आलं आहे.

ठाणे शहरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचं नाव प्रजित जोगेश केजे उर्फ ​​प्रजित तैलखलिद उर्फ ​​प्रजित टेके (वय 44 वर्ष) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रजित हा आधी सोशल साईटवर महिलांशी संपर्क साधायचा आणि नंतर स्वत: प्रचंड श्रीमंत असल्याचे सांगून महिलांना त्याच्या जाळ्यात ओढायचा.

आपले पॅरिसमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल असल्याचे सांगून तो महिलांवर भुरळ पाडायचा. एकदा महिला आरोपीच्या भूलथापांना बळी पडली की, तो तिची पैशाची फसवणूक करायचा. एवढंच नव्हे तर त्याने काही महिलांवर बलात्कार केल्याचा देखील आता त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.

मुंबई, ठाणे, केरळ, बंगळुरू आणि कलकत्ता यासारख्या शहरांमध्ये अनेक महिलांना त्याने फसवलं असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, या आरोपीने आतापर्यंत 26 महिलांची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सध्या ठाणे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपीने आणखी कोणाकोणाला फसवलंय याचीही कसून चौकशी करत आहे.

Mumbai: 25 वर्षीय तरुणासोबत विवाहित महिलेचे अनैतिक संबंध, तरुणाने अश्लील Video पाठवला थेट पतीला

दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना या वाढत आहेत. अशावेळी अनोळखी व्यक्तीशी ऑनलाइन मैत्री करताना सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषत: महिलांनी अनोळखी व्यक्तीशी ऑनलाइन मैत्री न करण्याचाच सल्ला सध्या पोलिसांकडून देण्यात येत आहे.

    follow whatsapp