पैशांसाठी 72 वर्षांच्या वृद्धेला झोपडीसह पेटवून जाळून मारलं, साताऱ्यातली धक्कादायक घटना

मुंबई तक

• 05:02 AM • 10 Jan 2022

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा साताऱ्यातल्या माण मध्ये एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला झोपडीसह पेटवून देत मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याने पैशांसाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेने संताप व्यक्त होतो आहे. नांदेडमध्ये तरूणाची 20 हजार रूपयांसाठी हत्या, हत्येचा थरार […]

Mumbaitak
follow google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

हे वाचलं का?

साताऱ्यातल्या माण मध्ये एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला झोपडीसह पेटवून देत मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याने पैशांसाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेने संताप व्यक्त होतो आहे.

नांदेडमध्ये तरूणाची 20 हजार रूपयांसाठी हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे (वय 72) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर नाना दिगंबर गलांडे (वय 20, रा. जाशी, ता. माण), असे संशयिताचे नाव आहे. जाशी येथील सीताबाई गलांडे या वृध्दा पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्या घरी कोणीच नसायचे. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा त्यांना पैशांसाठी वारंवार त्रास देत होता ही माहिती समोर आली आहे.

सातारा : हिरकणी रायडर्स ग्रूपच्या शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू

दि. 5 जानेवारी रोजी रात्री नाना गलांडेने या वृद्ध महिलेची झोपडी पेटवून दिली आहे. जवळपास कोणीच नसल्याने या घटनेची कोणालाच चाहूल लागली नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा तेथे आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे दिसले. त्यामध्ये सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्‍त केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने दि. 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास स.पो.नि. संतोष तासगावकर करीत आहेत.

    follow whatsapp