अभिनेता अजय देवगणची गाडी अडवणाऱ्याला अटक, जाणून घ्या काय घडलं?

मुंबई तक

• 12:30 PM • 02 Mar 2021

देशभरातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा प्रचंड गाजला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून लोकांनी सेलिब्रिटींनाही धारेवर धरलं होतं. तर आज बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याची गाडी एका व्यक्तीकडून रोखण्यात आली. यावेळी त्या व्यक्तीने अजयला शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाही असा सवाल केला. आज सकाळी बॉलिवूड अभिनेता @ajaydevgn फिल्मच्या शूटींगसाठी जात असताना त्याची गाडी रोखण्यात आली. गाडी रोखणाऱ्या […]

Mumbaitak
follow google news

देशभरातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा प्रचंड गाजला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून लोकांनी सेलिब्रिटींनाही धारेवर धरलं होतं. तर आज बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याची गाडी एका व्यक्तीकडून रोखण्यात आली. यावेळी त्या व्यक्तीने अजयला शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाही असा सवाल केला.

हे वाचलं का?

जवळपास सकाळी 9 वाजताच्या सुमारास अभिनेता अजय देवगण त्याच्या सिनेमाच्या शूटींगसाठी गोरेगावमधील फिल्म सिटमध्ये गाडीने जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीच्या समोर हा व्यक्ती आला आणि त्याने गाडी अडवून धरली. तब्बल 15 मिनिटं या व्यक्तीने अजय देवगणची गाडी रोखून धरली होती. दरम्यान पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर अजय देवगणने भारताविरोधातल्या दुष्प्रचाराला बळी पडू नका असं म्हटलं होतं.

काही वेळाने घटनास्थळी पोलीस आले आणि अजय देवगणची अडवून धरलेली गाडी सोडवण्यात आली. दरम्यान दिंडोशी पोलियांनी अजय देवगण याची गाडी रोखणाऱ्याला अटक केली आहे. या व्यक्तीवर आयपीसी कलम 341, 504, 506 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अजय देवगण याची गाडी रोखणाऱ्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, तो फक्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अजय देवगणशी बोलण्यास गेला होता. यामध्ये कोणताही मोठा गुन्हा नाहीये. त्याला पोलिसांनी का अटक केलीये हे मला समजत नाहीये. राजदीप सिंह असं त्या व्यक्तीचं नावं आहे. दरम्यान या व्यक्तीने गाडी अडवल्यानंतर अजयने गाडीतून हातंही जोडल्याचं दिसतंय.

    follow whatsapp