विक्रम गोखलेंनी व्यक्त केला संताप, म्हणतात… मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे!

मुंबई तक

• 11:49 AM • 19 Nov 2021

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली अनेक राजकीय मतं रोखठोकपणे मांडली. यावेळी त्यांनी तरुण पिढी ज्या पद्धतीने मोबाइलच्या आहारी जात आहे त्यावरुन प्रचंड संतापही व्यक्त केला. एवढंच नव्हे तर मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. मोबाइलवर कायद्याने बंदी आणा असं का म्हणाले विक्रम गोखले? […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली अनेक राजकीय मतं रोखठोकपणे मांडली. यावेळी त्यांनी तरुण पिढी ज्या पद्धतीने मोबाइलच्या आहारी जात आहे त्यावरुन प्रचंड संतापही व्यक्त केला. एवढंच नव्हे तर मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

मोबाइलवर कायद्याने बंदी आणा असं का म्हणाले विक्रम गोखले?

‘ज्या तरुणांना माझी भाषा समजते, ज्यांना माझं कम्युनिकेशन समजतं. जे साधारण तरी शिकलेले आहेत.. बारावी वैगरे.. त्यांना मी नेहमी सांगतो की, सारखं मोबाइल.. सारखं ते टिकटॉक सारखे फोन.. काय जेवला, कोणता सिनेमा बघितला हे करण्यापेक्षा आपल्या देशाचा इतिहास समजून घ्या. देश दूर राहू द्या… महाराष्ट्राचा इतिहास तपासून पाहा.’

‘या तरुण मुलांना कोणीतरी हे सांगायला पाहिजे.. कोणीही सांगत नसेल आपल्याला त्याचं महत्त्व वाटत असेल तर आपल्याला ते सांगायला पाहिजे. जास्तीत जास्त काय होईल ते म्हणतील ये म्हातारड्या आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही.. आम्हाला मोबाइलशीच खेळत बसायचंय… मग मी म्हणेन. तुम्ही कर्माने मरा..’

‘लाखो लोकांची माझ्यावर सध्या जी टीका-टिप्पणी आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. अशा लोकांविषयी माझी काहीही तक्रार नाही. जे अत्यंत घाणेरड्या, नीच भाषेमध्ये माझ्याबद्दल मजकूर लिहित आहेत त्यांच्याबद्दल मी द्वेष करत नाही.’

‘कारण ते अभ्यास करत नाहीत. खरी गोष्ट काय घडलेली आहे ते जाणून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. कारण सारखं मोबाइल… हे बंद केलं पाहिजे मोबाइल. हे कायद्याने बंद केला पाहिजे. इतकी भयानक वस्तू आहे ही आणि सोशल मीडिया.’ असं म्हणत विक्रम गोखले यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Vikram Gokhale: ‘मोदींची गणना जगातील शक्तीशाली लोकांमध्ये.. म्हणून यांची आग होते’, गोखलेंनी कोणावर साधला निशाणा?

‘तुमचे शिरच्छेद होतील..’

‘जर आत्ताच सावध झाला नाहीतर तर तुमचे शिरच्छेद होतील.. जो माणूस पृथ्वीतलावरचा एका विशिष्ट गोष्टीला मानत त्याचा शिरच्छेद करा, त्याला कापून काढा. तुकडे करा असं एक धर्म शिकवतो. हा धर्म गेली दीड हजार वर्ष इथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण कार्यरत आहेत. काही जण त्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारावं यासाठी त्यांचे पाय चाटतायेत.’ अशी टीकाही यावेळी विक्रम गोखलेंनी केली आहे.

    follow whatsapp