Amravati : राणा-कडूंमध्ये मंत्रिपदासाठी चुरस; सत्ताधारी गटातील स्थानिक वाद चव्हाट्यावर

मुंबई तक

27 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

अमरावती : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 18 जणांचा समावेश झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 22 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच मंत्रिमंडळ विस्तारात अमरावतीमधून मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यातूनच कडू आणि राणांमध्ये सातत्याने […]

Mumbaitak
follow google news

अमरावती : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 18 जणांचा समावेश झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 22 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच मंत्रिमंडळ विस्तारात अमरावतीमधून मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

त्यातूनच कडू आणि राणांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. नुकतेच अमरावतीच्या परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी केलेल्या टीकेला माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

ईडीचा मोर्चा आमदार रोहित पवारांकडे : ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीचे आदेश

काय म्हणाले होते रवी राणा?

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमाला आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूवर सडकून टीका केली. मी गुहाटीला जाणारा आमदार नाही, मी देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा मित्र आहे. याशिवाय ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैय्या हे या मतदारसंघातील आमदारांचे घोषवाक्य आहे असे म्हणतं बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता.

बच्चू कडू यांचे प्रत्यूत्तर :

यावर बच्चू कडूंनी देखील आमदार रवी राणांवर पलटवार केला आहे. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आलेच नसते. राणा दांपत्य मंत्री पदाच्या शर्यतीत उभे आहेत. तसेच बायकोला नाचवणाऱ्यांपैकी आम्ही नाही, तर नाचणारे आहोत असा पलटवारही कडू यांनी राणा दांपत्यावर केला आहे.

‘ज्या दिवशी बोलेल त्यावेळेस मात्र 8 दिवस हंगामा माजलेला असेल’; तानाजी सावंतांनी कुणाला दिला इशारा ?

२१ जूनला शिवसेनेत झालं सर्वात मोठं बंड

२१ जूनला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यांना शिवसेनतल्या ४० आणि इतर 10 अशा जवळपास 50 आमदारांची साथ लाभली आहे. यातच आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले आहे. याच सरकारमध्ये सध्या आमदार कडू आणि आमदार राणा यांच्यात चुरस रंगली आहे. राणा हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत.

    follow whatsapp