महिला दिनानिमित्ताने अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शिवाय अमृता फडणवीस नेहमी त्यांच्या गाण्यांमुळेही सतत चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं खास महिला दिनाच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिल- कुणी म्हणाले वेडी कुठली,कुणी म्हणाले […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:11 PM • 05 Mar 2021

follow google news

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शिवाय अमृता फडणवीस नेहमी त्यांच्या गाण्यांमुळेही सतत चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं खास महिला दिनाच्या निमित्ताने रिलीज होणार आहे.

हे वाचलं का?

या गाण्यासंदर्भातील घोषणा अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून केलीये. त्या म्हणाल्या, ” जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला- कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी.”

यासोबत अमृता फडणवीस यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अमृता फडणवीस मराठमोळ्या पारंपारिक वेषभूषेत दिसत आहेत. याचसोबत #InternationalWomensDay असा हॅशटॅगंही अमृता यांनी ट्विटमध्ये दिलाय.

अमृता फडवणवीस यांना अनेकदा त्यांच्या गाण्यांवरून ट्रोल केलं जातं. दरम्यान यापूर्वीच 8 मार्चला नवं गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय आणि या गाण्याच्या माध्यमातून मी ट्रोलर्सना उत्तर देईन, असं अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला खडे बोल सुनावले होते.

    follow whatsapp