मुलीचं लग्न चार दिवसांवर असताना बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या

builder tushar ghelani attempts suicide : कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना महावीर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रकृतीची नाजूक स्थिती पाहता, त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 09:51 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीचं लग्न चार दिवसांवर असताना बिल्डरचं टोकाचं पाऊल

point

स्वत:वर गोळ्या झाडल्या

builder tushar ghelani attempts suicide : गुजरातमधील डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. सुरत येथील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आणि ‘जॉली ग्रुप’चे सर्वेसर्वा तुषार घेलाणी यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा टोकाचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिटीलाइट परिसरातील तुषार घेलाणी यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तुषार घेलाणी यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून एक राउंड फायर केला. गोळीबाराचा मोठा आवाज ऐकून घरातील सदस्य घाबरून खोलीकडे धावले. तेथे दिसलेलं दृश्य अत्यंत भयावह होतं. तुषार घेलाणी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते.

कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना महावीर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रकृतीची नाजूक स्थिती पाहता, त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : पार्थ पवार भेटायला आल्यानंतर काय म्हणाले? विलीनीकरणाबाबत चर्चा झाली का? शरद पवारांनी सगळं सांगितलं!

या घटनेची सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे येत्या 5 फेब्रुवारी रोजी तुषार घेलाणी यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं. आजपासूनच लग्नाच्या प्राथमिक विधी आणि सोहळ्यांना सुरुवात होणार होती. घरात मंडप सजवण्यात आला होता, पाहुण्यांचं येणं-जाणं सुरू झालं होतं. मात्र, या एकाच घटनेने सगळं चित्र पालटलं. ज्या घरात आनंदाचे सूर घुमणार होते, तिथे आता पोलीस बंदोबस्त दिसून येत आहे.

लग्नासाठी करण्यात आलेली सजावट आणि मंडप हटवण्याचं काम सुरू आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना या अनपेक्षित घटनेची माहिती दिली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येच्या प्रयत्नात वापरण्यात आलेली रिव्हॉल्वर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

प्राथमिक तपासात या टोकाच्या पावलामागे कौटुंबिक वादाची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी पोलीस अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. कुटुंबीयांची आणि जवळच्या व्यक्तींची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सन 1990 पासून बांधकाम क्षेत्रात सक्रिय असलेले तुषार घेलाणी हे सुरतमधील एक प्रतिष्ठित नाव मानले जातात. आधुनिक वास्तुकला आणि आलिशान प्रकल्पांसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण बिल्डर लॉबीला मोठा धक्का बसला आहे. तुषार घेलाणी यांचे निकटवर्तीय मित्र अशोक घेलाणी यांनी सांगितले की, तुषार नेहमी इतरांना धीर देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी असं पाऊल का उचललं, हे कोणालाही समजत नाही. सध्या संपूर्ण सुरत शहर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत असून, या घटनेचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?
 

    follow whatsapp