अरबाझ मर्चंटच्या वडिलांनी आर्यनला विचारलं, ‘तुला घरचं जेवण आणून देऊ का?’ आर्यन म्हणाला…

रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ही पार्टी करण्यात येणार होती. याची माहिती NCB ला म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच त्यांनी ही कारवाई केली. या सगळ्या कारवाईत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी आर्यन खान, अरभाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:40 PM • 04 Oct 2021

follow google news

रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ही पार्टी करण्यात येणार होती. याची माहिती NCB ला म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच त्यांनी ही कारवाई केली. या सगळ्या कारवाईत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी आर्यन खान, अरभाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

या सगळ्या प्रकरणात आर्यन खानला कोर्टाच्या बाहेर अरबाज मर्चंटचे वडील भेटले. त्यांनी आर्यनला ‘तुला घरचं जेवण आणून देऊ का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर अरबाजच्या वडिलांना दिलं. त्यानंतर त्यांनी अरबाजला जेवण दिलं. तो कॉरिडॉरमध्ये बसून खात होता, मात्र शाहरूखच्या मुलाने म्हणजेच आर्यनने घरी तयार केलेलं जेवण नाकारलं आहे.

आर्यन खानला रविवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यन खान NCB च्या मेसमध्येच जेवला. आजही त्याला अरबाज मर्चंटच्या वडिलांनी विचारलं तेव्हा त्याने घरचा डबा नको असं सांगितलं आहे. आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही सात ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

शाहरुखसोबत आर्यनची फोनवरुन बातचीत

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनशी फोनवर बोलला आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्यांच्या लँडलाईन फोनवरून सुमारे 2 मिनिटे बोलण्यास परवानगी दिली होती.

Shah Rukh Khan Son: EXCLUSIVE: NCB चे अधिकारी अचानक आर्यन खान समोर आले, अन्…

देशाबाहेर असतानाही केलं आहे ड्रग्सचं सेवन

एनसीबीच्या चौकशीत असे उघड झाले की, आर्यन हा तब्बल 4 वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत आहे आणि आर्यनने भारताबाहेर म्हणजेच यूके-दुबई किंवा इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे. यामुळेच NCB कडून सातत्याने आर्यनची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी सुरु आहे.

यापूर्वी, एनसीबीने क्रूझमधील त्यांच्या छाप्याबद्दल आणि तेथून जप्त केलेल्या ड्रग्सबाबात निवेदन जारी केले होते. एनसीबीने टिपच्या आधारावर क्रूझवर कारवाई केली होती. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत. .

    follow whatsapp