T-20 World Cup: मॅच इंडिया-इंग्लंडची अन् Video व्हायरल झाला धोनी आणि त्याच्या बायकोचा, अरे नेमकं झालं तरी काय?

Sakshi Dhoni Viral Video: टी-20 विश्वचषक 2026च्या भारत आणि इंग्लंडमधील सेमीफायनल रंगली. ज्यामध्ये अचानक महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:00 AM • 06 Mar 2026

follow google news

मुंबई: टी-20 विश्वचषक 2026च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. पण सामन्यातील एका मजेदार घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले होते. त्याचवेळी मैदानातील VIP बॉक्समध्ये असं काही घडलं की, ज्याचा व्हिडिओ हा काही क्षणात व्हायरल झाला.

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज बॅथल याला अटीतटीच्या क्षणाला अर्शदीपने एक डॉट बॉल टाकला. जो एक टप्पा पडून अर्शदीपकडे थेट आला. पण त्याचवेळी साक्षी धोनीला असा समज झाला की, बॅथल बाद झाला आहे. त्यामुळे ती अक्षरशः आनंदाने उड्या मारून नाचू लागली. पण प्रत्यक्षात बॅथल बाद नव्हता झाला. हे पाहून धोनीलाही हसू आवरलं नाही. त्यामुळे त्याने हसत-हसत साक्षीला खाली बसवले. पण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
सामन्यादरम्यान इंग्लंडच्या डावात गोलंदाज अर्शदीप याने बॅथलला डॉट बॉल टाकला. त्यावेळी स्टेडियममधील VIP बॉक्समध्ये बसलेल्या साक्षीने हे पाहून उत्साहात हात उंचावले आणि नाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्या आजूबाजूला असलेले लोकही हसत होते. पण धोनीने तिला शांत करत खाली बसवले. 

'त्या' क्षणाचा व्हिडिओ 

दरम्यान, त्याच क्षणाचा व्हिडिओ  हा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यापैकी एका ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मात्र एक डॉट बॉल की इतनी खुशी ये है क्रिकेट का जूनून हालांकि साक्षी ने इसे आउट समझा बाद में धोनी ने उनको बताया..."

हे ही वाचा>> T-20 World Cup: टीम इंडियाचा नवा हिरो... सलग दोन Half Century ठोकणारा संजू सॅमसन आहे तरी कोण?

व्हिडिओमध्ये दिसते की, साक्षी गुलाबी रंगाच्या पारंपरिक पोशाखात आहे, आणि ती उडी मारून हात हलवत आनंद साजरा करत आहे. तर धोनी काळ्या टी-शर्टमध्ये तिच्या मागे उभा आहे आणि तो तिला हसत-हसत खाली बसण्यास सांगतोय.. 

हा क्षण "कॅप्टन कूल" धोनीच्या शांत स्वभावाचा आणि साक्षीच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण उदाहरण आहे. एका पोस्टमध्ये म्हटले आहे: "Sakshi dancing on dot ball and Dhoni's reaction 😭😂😭😂" 

दुसऱ्या पोस्टमध्ये: "#SakshiDhoni इतनी एक्साइटेड हो गईं कि उछलने लगीं, तब बगल में बैठे MS Dhoni ने हंसते हुए उन्हें शांत कराया।

धोनी-साक्षीची उपस्थिती आणि सामन्याची पार्श्वभूमी

धोनी आणि साक्षी हे खरं तर गुरुवार (5 मार्च) अर्जुन तेंडुलकरच्या लग्नासाठी मुंबईत आले होते. या लग्न सोहळ्यानंतर ते थेट वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले. स्टेडियममध्ये धोनीची उपस्थिती पाहून चाहत्यांनी "धोनी! धोनी!" असा जयघोष केला. सामन्यापूर्वी धोनीने रोहित शर्मासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. 

दरम्यान, सेमीफायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 253 धावा केल्या. तर इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. पण या विजयापेक्षा धोनी-साक्षीचा हा मजेदार क्षण चाहत्यांसाठी अधिक लक्षवेधी ठरला. सोशल मीडियावर याबाबत अनेक मीम्स आणि कमेंट्स फिरत आहेत.

    follow whatsapp