Commited Suicide : आजाराला कंटाळून एका व्यक्तीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी कोणताही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार देण्यात आला. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नरेंद्र शर्मा असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 7 वीत शिकणाऱ्या मुलीला मोबाईलचं व्यसन, मोबाईल देण्यास बहिणीचा नकार, अखेर स्वत:ला संपवलं
नरेंद्र शर्मा यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासलं
नरेंद्र शर्मा हे हरियाणा येथील रहिवासी आहेत, ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. बुधवारी नरेंद्र शर्मा सेक्टर 143 येथील गुलशन इकवाना सोसायटीतील रहिवासी असलेला आपला भाऊ आणि आपल्या वडिलांकडे आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लीवरचा आजार होता, यामुळे त्यांना त्रास व्हायचा.
12 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं
त्यांच्या प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांनी नोएडा गाठलं होतं. नरेंद्र हे गुरुवारी दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, कुटुंबियांनी त्याला सेक्टर 137 मधील रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले.
हे ही वाचा : शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर
प्राथमिक तपासातून समोर आले की, त्यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासले होते, याच त्रासाला कंटाळून नरेंद्रने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी कुटुंबाकड़ून कतोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नाही, असे स्टेशन ऑफिसर विनोक कुमार मिश्रा यांनी सांगितले.
ADVERTISEMENT











