बच्चू कडूंचा चढला पारा! ‘शांत बस’ म्हणत लगावली कानशिलात; प्रकरण काय?

मुंबई तक

• 07:47 AM • 28 Sep 2022

काही दिवसांपूर्वीच जुन्या प्रकरणात जामीनावर सुटलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा वादात सापडले आहेत. बच्चू कडूंचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. २०१८ मधील मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात जामीन मिळालेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारामुळे चर्चेत […]

Mumbaitak
follow google news

काही दिवसांपूर्वीच जुन्या प्रकरणात जामीनावर सुटलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा वादात सापडले आहेत. बच्चू कडूंचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

२०१८ मधील मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात जामीन मिळालेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारामुळे चर्चेत आलेत. अमरावतील जिल्ह्यातल्या गणोजा गावात हा प्रकार घडला आहे.

बच्चू कडूंनी कानशिलात का लगावली?

बच्चू कडू एका व्यक्तीच्या कानशिलात मारत असतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार बच्चू कडू गणोजा येथे उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या कामावरून तिथे वाद झाला.

व्हिडीओत बच्चू कडू यांच्यासमोर दोन व्यक्ती बोलत आहे. त्यातल्या एका व्यक्तीला बच्चू कडू ऐकून घे आधी, शांत बस असं म्हणत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं बोलणं सुरूच होतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

बच्चू कडू यांनी ज्या व्यक्तीच्या कानशिलात मारली. ती व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र, ही व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता नसून, तो स्थानिक नागरिक असल्याचं सांगितलं जातंय.

यापूर्वीही बच्चू कडूंनी केलीये मारहाण

बच्चू कडू यांनी एखाद्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये बच्चू कडू हे मंत्रालयामध्ये राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक पी प्रदीप यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टेबलावरील लॅपटॉप उगारला होता. त्याच प्रकरणात गेल्या आठवड्यात बच्चू कडूंना जामीन मिळाला.

कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मारली होती कानाखाली

कोविड महामारीच्या काळातही बच्चू कडू यांनी कोविड रुग्णालयातील स्वयंपाक बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दल कडू यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या.

बच्चू कडू यांनी कोविड रुग्णांसाठी जेवण बनवल्या जाणाऱ्या मेसची पाहणी केली होती. रुग्णांना जेवणासाठी किती साहित्य लागते याची चौकशी बच्चू कडूंनी केली होती. मात्र, स्वयंपाकी कर्मचाऱ्यांने दोन वेळा वेगवेगळी माहिती दिल्यानंतर बच्चू कडूंनी या कर्मचाऱ्याला कानाखाली मारली होती.

    follow whatsapp