Bhagirath Biyani | बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

बीड : भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या एमआयडीसी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचीत होते. दरम्यान बियाणी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलीस करत आहे. याबाबत मिळालेली […]

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

follow google news

बीड : भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या एमआयडीसी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचीत होते. दरम्यान बियाणी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलीस करत आहे.

हे वाचलं का?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बियाणी यांनी सोमवारी रात्री आपल्या कुटुंबासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले. आज सकाळी उशिरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने कुटुंबियांनी पाहिले तर बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.

कुटुंबियांनी बियाणी यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेश शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्ते रुग्णालयात पोहचले. आत्महत्या मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक करत आहेत.

बियाणी यांच्या निधनानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दुखःद भावना व्यक्त केल्या. माझा अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता भगीरथ बियानी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. भगीरथ असं जायला नको होतंस, असं ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते भगीरथ दादा बियानी यांच्या दुःखद निधनामुळे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत आहे, असे खासदार प्रितम मुंडे यांनी सांगितले.

    follow whatsapp