गँगरेपनंतर नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून आतडीच... प्रचंड चीड आणणारी घटना

मुंबई तक

28 May 2025 (अपडेटेड: 28 May 2025, 09:29 PM)

Khandwa Gangrape Case :  मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक चित्र

प्रतिकात्मक चित्र

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेवर दोन नराधमांनी केला सामुहिक बलात्कार

point

खूप जास्त रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेचा मृत्यू

point

पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Khandwa Gangrape Case :  मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी नराधमांनी या महिलेच्या गुप्तांगात हात टाकल्याने आतड्यांमधून रक्तस्त्राव झाला आणि पीडित महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हरी (40) आणि सुनील (35) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हे वाचलं का?

खूप जास्त रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेचा मृत्यू

खरगोन परिसराचे आयजी सिद्धार्थ बहुगुणा आणि कलवा ठाण्याचे प्रभारी इन्सपेक्टर जगदीश सिंधिया यांनी फोनवर माहिती दिली की, आतापर्यंत घटनास्थळावरून लोखंड आणि लाकडाचा कोणताही रॉड जप्त करण्यात आला नाही. महिलेचा मृत्यू खूप जास्त रक्तस्त्रावमुळे झाला. लैंगिक शोषण केल्यानंतर आरोपी हरीने त्याच्या हात शरीराच्या आत टाकला होता. ज्यामुळे शरीरातील आतडे बाहेर आले, असा जबाब आरोपींनी पोलिसांना दिला.

हे ही वाचा >> 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला हॉटेलवर बोलावलं, शारीरिक संबंधानंतर तरुणाने...

आरोपींनी आतड्यांना शरीरात टाकण्याचा प्रयत्न केला. गर्भाशयाला इजा झाली नाही, पण आतडे बाहेर आले होते. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. घटनास्थळावरून आम्ही रक्ताने माखलेले बेड रोल जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना रिमांड वर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालाची प्रतिक्षा आहे.  आरोपींवर कलम 66, 70 (1) आणि 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सामूहिक बलात्काराची घटना जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 90 किमीवर असलेल्या रोशनी पोलीस चौकीच्या हद्दीत घडली. खूप रक्तस्त्राव झाल्याने 2.30 वाजता तिचा मृत्यू झाला. मंदसौर येथील माजी खासदार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी नटराजनने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटलं, माणुसकीला काळीमा फासणारी खंडवा येथील घटनेबाबत सरकार मौन बाळगून का बसलं आहे, हे आदिवासी प्रकरण निर्भया सारखं आहे. 

हे ही वाचा >> धक्कादायक... कल्याणनंतर डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू, महाराष्ट्रात पुन्हा कोव्हिडचं थैमान?