16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला हॉटेलवर बोलावलं, शारीरिक संबंधानंतर तरुणाने...

मुंबई तक

एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर तरुणाशी मैत्री करणं हे चांगलंच महागात पडलं आहे. कारण याच तरुणाने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्यावर अनेकदा जबरदस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
अल्पवयीन मुलीवर अत्याचार (प्रातिनिधिक फोटो)
social share
google news

नैनीताल: उत्तराखंडमध्ये एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करून एका मुलाने लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर आरोपी मुलाने पीडितेला धमकीही दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलीस तपासात आरोपी मुलगा फरार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. आरोपी मुलाला लवकरच अटक करून तुरुंगात पाठवले जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. नैनीतालमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर एका तरुणाने तिला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

हे ही वाचा>> 45 वर्षांचा दिनेश 65 वर्षांच्या प्रेयसीकडे शारीरिक संबंधांसाठी गेला, पण महिलेचा जीवच गेला.. नेमकं काय घडलं?

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीची सोशल मीडियाद्वारे लालकुआं येथील रहिवासी असलेल्या एका मुलाशी मैत्री झाली होती. जानेवारीमध्ये, तरुणाने तिला भेटण्यासाठी हल्द्वानी येथे बोलावले होते. असा आरोप आहे की, मुलाने तिच्याशी एका हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते.

यानंतर, तरुणाने तिला वारंवार भेटण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मुलीने नकार दिल्यावर तो तिला बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा>> पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत करता होता 'हे' काम, असं उघड झालं गुपित

तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी लालकुआं येथील रहिवासी निर्मल कुमार उर्फ हॅपीविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. एसओ रमेश सिंह बोहरा म्हणाले की, तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp