बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण, सहा महिन्यांत ४०० हून अधिकांनी केले अत्याचार

मुंबई तक

• 01:34 PM • 12 Nov 2021

– रोहिदास हातागळे, बीड प्रतिनिधी राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच ९ नोव्हेंबर ला बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या पतीसह वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केलं असून यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात या पीडित मुलीवर […]

Mumbaitak
follow google news

– रोहिदास हातागळे, बीड प्रतिनिधी

हे वाचलं का?

राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच ९ नोव्हेंबर ला बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या पतीसह वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केलं असून यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या सहा महिन्यांच्या काळात या पीडित मुलीवर ४०० पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले आहेत, ज्यात एका पोलिसाचाही समावेश असल्याची माहीती प्रथमवर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

‘नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ’ म्हणून बापच छळायचा; दोघांनी जेवण देतो म्हणून केला बलात्कार

संबंधित अल्पवयीन मुलगी २० आठवड्याची गर्भवती राहिल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरुन हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या अल्पवयीन मुलीवर ओढावलेला प्रसंग हा अंगावर काटा आणणारा आहे.

पीडित मुलीची आई ती लहान असतानाच वारली. पीडित मुलगी सातवीपर्यंत शिकलेली आहे. वसती गृहात राहत असताना ७ वी नंतर वडील मला गावी घेऊन गेले. त्यानंतर लगेच अंदाजे १९ मे २०१८ च्या दरम्यान पीडित मुलगी १३ वर्षांनी असताना बळजबरीने तिचं लग्न लावून देण्यात आलं. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधीत अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला.याबाबत मी तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा गेले मात्र संबंधीत पोलिसांनी मला अनेकदा तेथून हूसकावून लावले. माझे म्हणणे ऐकून सुध्दा दोषीवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर एका पोलिस कर्मचा-याने देखील माझ्यावर अत्याचार केलेला आहे.असे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले आहे.

    follow whatsapp