Raj Thackeray : 'आमच्या टेलिव्हिजन वाल्यांची देखील वाट लावून ठेवली आहे, सारखा वरून दबाव आहे. ही बातमी टाकायची नाही, हे करायचं नाही. सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला तर बातम्या बंद करू जाहिरात बंद करू, नोकरीवरून काढून टाकू', या अशा विचित्र परिस्थितीत देश अडकलेला आहे,' असं म्हणत त्यांनी उपस्थितांसमोर खंत व्यक्त केली. गुढीपाडव्यानिमित्त 19 मार्च 2026 रोजी मनसेचा मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. या मेळाव्यात राज्यातून लाखोंचा जनसागर लोटला होता. त्यांनी बोलताना, महाराष्ट्रावरती आलेल्या संकटावर सरकारला प्रश्न केलेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गुढीपाडव्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं, मुंबई -पुणे महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी उपस्थितांशी बोलताना सांगितलं की, 'पहिल्यांदा त्या इंस्टाग्राममधून बाहेर या. हे मी सांगतोय कारण तुम्हाला यातच गुंतवून ठेवलं आहे. सरकारला तुम्हाला काहीही विचारता येऊ नये याचंच हे एक डिझाइन आहे. हे केवळ भारतात सुरू नसून जगभरात सुरु आहे. तुम्ही आयपीएल, टेलिव्हीजन, चित्रपटांमध्ये अडकवून ठेवलंय. पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, आता कशाला येतील, कारण आता मोबाइलवरतीच व्यक्त होतायत. तुम्हाला यात गुंतवून टाकलं, जेणेकरून तुम्ही सरकारला प्रश्न विचारले जाऊ नये'.
'टेलिव्हिजन वाल्यांची देखील वाट लावून ठेवली'
'आमच्या टेलिव्हिजन वाल्यांची देखील वाट लावून ठेवली आहे, सारखा वरून दबाव आहे. ही बातमी टाकायची नाही, हे करायचं नाही. सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला तर बातम्या बंद करू जाहिरात बंद करू, नोकरीवरून काढून टाकू', या अशा विचित्र परिस्थितीत देश अडकलेला आहे,' असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
हे ही वाचा : तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर; भाजप प्रवेश करुन परतत असताना काय घडलं?
2014 ते 2026 मध्ये राज्यावर 11 लाख कोटींचं कर्ज
'उद्या आपल्या आजूबाजूचं काय निघून गेलं ना कळणार नाही, कारण आपण मोबाईलमध्ये अडकलोय. आमचे मुख्यमंत्री सांगतात विकास करायचा, विकास... जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा 2 लाख कोटींचं कर्ज होतं, त्यानंतर 2014 ते 2026 मध्ये हे कर्ज 11 लाख कोटींवर गेलं. शहरांची अवस्था बघा, सगळीकडे ट्राफिक, फूटपाथ जाम, आयुष्य नावाची काही गोष्ट असते ना? ब्रिटीशांमुळे हे मैदानं उभी राहिली. लहान मुलांसाठी काय केलं? असे सवाल त्यांनी सरकारला केलेत. आज ग्रामीण भागातून अनेक लोक शहरात यायचंय म्हणतात, शेतीकडे जायला तयार नाहीत आणि इथे शहराकडे अशी स्थिती', असं राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT











