'महिलेला आधी पाठमोरी उभी केली अन् नंतर..', भोंदू अशोक खरातचा अत्यंत अश्लील Video आला समोर

ashok kharat viral video: नाशिकमध्ये फेक ज्योतिषी व 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याचा एक अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य प्रचंड वाढलं आहे.

copper vessel placed on woman head and then perform obscene acts story of ashok kharat who claimed to be an astrologer

Ashok Kharat Viral Video Nashik

मुंबई तक

• 07:08 PM • 19 Mar 2026

follow google news

नाशिक: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला रिटायर्ड मर्चंट नेव्ही अधिकारी, ज्योतिषी, अंकशास्त्री आणि कॉस्मोलॉजी तज्ज्ञ म्हणवणारा अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँच युनिटने ही मोठी कारवाई केली असून, तपासादरम्यान आरोपीकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमुळे हे संपूरण प्रकरण अधिक संवेदनशील आणि खळबळजनक बनले आहे.

हे वाचलं का?

'महिलेला पाठमोरी उभं केलं अन्..', अशोक खरातचा आक्षेपार्ह व्हिडिओ आला समोर

अशोक खरात याला अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा एक अत्यंत अश्लील व्हिडिओ हा समोर आला. जो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अशोक खरातच्या 58 आक्षेपार्ह व्हिडिओंपैकी एक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

अशोक खरात हा एका महिलेला आपल्या ऑफिसमध्ये बोलावतो. तो धार्मिक अनुष्ठान/मंत्रसाधना च्या बहाण्याने तिच्या डोक्यावर तांब्या ठेवतो. त्यानंतर तिला पाठमोरी उभी राहण्यास सागंतो.. आणि नंतर आपल्या टेबलावरील एक ग्लास उचलून त्यात लघुशंका करतो. 

यानंतर तो महिलेशी आपत्तिजनक आणि लैंगिक स्वरूपाचे वर्तन करतो. व्हिडिओमध्ये तो सातत्याने महिलेसोबत अत्यंत अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा>> रुपाली चाकणकरांकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं ट्वीट व्हायरल

सोशल मीडियावर अशोक खरातच्या या व्हिडिओचा काही सेकंदाचा छोट्या भाग व्हायरल आहेत. पूर्ण व्हिडिओ अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

अशोक खरातविरोधात तक्रार आणि घटनाक्रम

दरम्यान, एका पीडित महिलेने (वय 35 वर्षे) सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. महिलेच्या तक्रारीनुसा, तिने वैवाहिक समस्या आणि इतर वैयक्तिक अडचणींसाठी अशोक खरात यांच्याकडे संपर्क साधला होता. खरातने तिच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले होते. तेथे तो 'धार्मिक अनुष्ठान', 'मंत्रसाधना' आणि 'उपाय' यांच्या बहाण्याने तिच्यावर विश्वास निर्माण करत असे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 

आरोपीची पार्श्वभूमी

अशोक खरात स्वतःला 'कॅप्टन' म्हणवतो आणि रिटायर्ड नेव्ही कॅप्टन असल्याचा दावा करतो. तो सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान (किंवा श्री इशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट) चा अध्यक्ष आहे, जे 2010 मध्ये स्थापन झाले. मंदिराजवळच त्याचा आलिशान फार्महाउस आहे. स्थानिक लोक आणि माध्यमांच्या माहितीनुसार, या ठिकाणी राजकीय नेते, व्यापारी, कलाकार, सेलिब्रिटी आणि व्हीआयपी व्यक्तींची नेहमी वर्दळ असायची. अनेकजण त्याच्याकडून भविष्य जाणून घेण्यासाठी आणि सल्ल्यासाठी येत असत. त्याच्या मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपयांची असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

पोलिसांची कारवाई आणि तपास

नाशिक क्राइम ब्रँचने 18 मार्च 2026 रोजी खरातला अटक केली. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी पेन ड्राइव्हमधून 58 व्हिडिओ जप्त केले असून, त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या मालमत्ता, फार्महाउस आणि इतर शहरांमधील संपत्तीचीही चौकशी सुरू केली आहे.

प्रकरणाचे राजकीय वळण

या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खरातच्या ट्रस्टशी संबंधित असल्याच्या आणि त्याचे पाय धुणारे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

तपास अधिक खोलवर नेला जात असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने हाताळले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य सातत्याने वाढत आहे.

    follow whatsapp