'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घाला आणि महाराष्ट्रात...', संदीप देशपांडे यांचा सरकाला तिखट सवाल

Sandeep Deshpande : गुढीपाडव्यानिमित्त आज 19 मार्च 2026 रोजी मनसेचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यातून लाखोंच्या संख्येनं जनसागर लोटला होता. या मेळाव्याला संदीप देशपांडे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं. त्यांनी बोलताना, परप्रांतीय लोंढ्यांच्या आक्रमणावर भाष्य केलं.

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande

मुंबई तक

19 Mar 2026 (अपडेटेड: 19 Mar 2026, 10:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घालायची आणि महाराष्ट्रात वाढवायची'

point

संदीप देशपांडे शिवतीर्थावरून कडाडले

Sandeep Deshpande : गुढीपाडव्यानिमित्त आज 19 मार्च 2026 रोजी मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज्यातून लाखोंच्या संख्येनं जनसागर लोटला होता. या मेळाव्याला संदीप देशपांडे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं. त्यांनी बोलताना, परप्रांतीय लोंढ्यांच्या आक्रमणावर भाष्य केलं. 'नुकतीच मुंबई ते रत्नागिरी ट्रेन रद्द केली आणि त्याऐवजी दादर ते गोरखपूर ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. किती लोक आणून तुम्ही महाराष्ट्रात  आदळणार आहात?, आम्ही कितीदा हे सहन करावं हे सरकारने सांगितलं पाहिजे', असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गुढीपाडव्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं, मुंबई -पुणे महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घालायची आणि महाराष्ट्रात वाढवायची'

यावेळी बोलताना त्यांनी सरकावर टीकेचे अस्त्र ओढले, 'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घालायची आणि महाराष्ट्रात वाढवायची हे किती दिवस चालणार आहे?' असा प्रश्न केला. नंतर ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र जर हा आपला देश असता, तर आपली अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर असती. मी फडणवीसांना विचारतो की, एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे की, करोडो रुपये महाराष्ट्रातून दिल्लीला जातात. महाराष्ट्र देशाचा 25 टक्के खर्च उचलतो, मग महाराष्ट्रात कोणी यायचं आणि कोणी नाही? हे महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की नाही', असा तिखट सवाल त्यांनी केला. 

हे ही वाचा : आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

'किती दिवस आम्ही हे लोंढे सहन केले पाहिजे?'

किती दिवस आम्ही हे लोंढे सहन केले पाहिजे? आता यापुढे आपण विचार केला पाहिजे कोणाला यायचं आणि यायचं. रस्त्यावरून रस्ते होतायत, पुल होतायत, मेट्रो सुविधा असूनही गर्दी कमी होत नाही. आधी वाटायचं की, युतीच्या काळात उड्डाणपूल झाल्यावर वाहतूक सुरळित होईल, पण वाहतूक अजूनही सुरळीत होत नाही. याचं कारण वाढणारी ही गर्दी आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये परप्रांतीय येतात आणि त्यांना घरं दिली जातायत आणि आमची मराठी माणसाची स्थिती काय? असा उलट सवाल सरकारला केला.  

    follow whatsapp