NCP नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे नवे फोटो आले समोर

Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याला अटक केल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. कारण अनेक राजकारणी हे अशोक खरातची भेट होते. त्यातच आता रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे काही जुने फोटो समोर आले आहेत.

4 new photos of ncp leader rupali chakankar with ashok kharat have surfaced opposition demands chakankar resignation

रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे नवे फोटो

मुंबई तक

19 Mar 2026 (अपडेटेड: 19 Mar 2026, 07:55 PM)

follow google news

नाशिक: नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी व 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या अश्लील व्हिडिओच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, विरोधकांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत आहे.

हे वाचलं का?

नव्या व्हायरल फोटोंमध्ये काय?

फोटो क्रमांक 1- अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे 4 नवे फोटो आता समोर आले आहेत. त्यापैकी एका फोटोत रुपाली चाकणकर आणि अशोक खरात एकत्र उभे दिसत आहेत. खरात नारंगी-तपकिरी कुर्ता-पायजमा आणि चाकणकर पारंपरिक साडीत (पिवळ्या-हिरव्या रंगाची) दिसत आहेत. यावेळी रुपाली चाकणकरांनी अशोक खरातचा हात धरल्याचं दिसून येत आहे.

फोटो क्रमांक 2- दुसऱ्या फोटोत एखाद्या समारंभात (कदाचित जन्मदिन) दोघे एकत्र केक कापताना किंवा केक भरवताना दिसत आहेत. आसपास अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

 

फोटो क्रमांक 3 - तिसऱ्या फोटोत रुपाली चाकणकर या एका कार्यक्रमात अशोक खरातला एखादा पदार्थ भरवत असल्याचं दिसून येत आहे.

 

फोटो क्रमांक 4 - चौथ्या फोटोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खरात यांच्या समोर रुपाली चाकणकर या नतमस्तक झालेल्या दिसत आहे.

हे फोटो आता समोर आल्याने रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

संस्थेशी थेट संबंध

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थान (श्री इशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट) चा अध्यक्ष आहे. या ट्रस्टशी रुपाली चाकणकर यांचा विश्वस्त म्हणून संबंध असल्याचे समोर आले आहे. फोटोंमधून दिसते की, त्या खरात यांच्या मंदिरात आणि कार्यक्रमात नियमित उपस्थित राहिल्या असाव्यात. खरात यांच्याकडे अनेक राजकीय नेते, मंत्री (एकनाथ शिंदे, दीपक केसरकर) आणि प्रभावशाली व्यक्ती येत असल्याचे पूर्वीच समोर आले होते.

हे ही वाचा>> 'महिलेला आधी पाठमोरी उभी केली अन् नंतर..', भोंदू अशोक खरातचा अत्यंत अश्लील Video आला समोर

रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

या फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा आरोपांबाबत मला कल्पना नाही. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडे येत असत. आता जे आरोप आहेत, त्याबाबत पोलिस निष्पक्ष चौकशी करतील. तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे." त्या म्हणाल्या की, हे फोटो जुने असून धार्मिक/सांस्कृतिक संदर्भात आहेत.

विरोधकांची टीका आणि राजीनामा मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी खरात यांना चाकणकर यांचा 'गुरु' म्हणून संबोधले आणि महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा आरोपीचा सन्मान केल्याबद्दल टीका केली.

हे ही वाचा>> आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

नाशिक क्राइम ब्रँच तपास सुरू ठेवला असून, 58 आक्षेपार्ह व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी चालू आहे. हे फोटो प्रकरण अधिक संवेदनशील बनवत आहेत. पोलिसांनी जनतेला आक्षेपार्ह सामग्री शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. प्रकरण पुढे कसे वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशा फेक ज्योतिष्यांशी संबंध ठेवताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

    follow whatsapp