GST विभागाची महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई : व्यापारी वर्गात खळबळ

मुंबई तक

01 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

GST Department News : इस्लामपूर : कोट्यवधी रुपयांचा मूल्यवर्धीत कर (VAT) थकविल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील चार कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यावेळी त्यांनी अन्य व्यापाऱ्यांनीही थकीत कर त्वरीत भरण्याचं आवाहन केलं. दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे व्यापारी वर्गाचे […]

Mumbaitak
follow google news

GST Department News :

हे वाचलं का?

इस्लामपूर : कोट्यवधी रुपयांचा मूल्यवर्धीत कर (VAT) थकविल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील चार कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यावेळी त्यांनी अन्य व्यापाऱ्यांनीही थकीत कर त्वरीत भरण्याचं आवाहन केलं. दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. (Kolhapur GST Department action against big Merchant)

या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील पेठ (इस्लामपूर) येथील चार खाद्य तेल कंपन्यांवर मूल्यवर्धीत कर थकविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभागाने कडक कारवाई केली आहे. या चारी कंपन्या संतोष कुमार देशमाने यांच्याशी संबंधित आहेत. देशमाने यांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

Union Budget 2023 : अर्थसंकल्पातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

मेसर्स संतोष कुमार माने, महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, महेश व्हेज ऑईल्स आणि महालक्ष्मी ऑईल इंडस्ट्रीज या देशमानेंच्या चार कंपन्यांनी २०११ ते २०१८ या कालावधीतील ८४.७७ कोटींचा मूल्यवर्धीत कर थकविला होता. वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना, नोटिसा देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेरीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Union Budget 2023 : शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय?

ही कोल्हापूर विभागासह राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य कर सह आयुक्त सुनीता थोरात यांनी विभागातील ज्या ज्या व्यापाऱ्यांची थकबाकी शिल्लक असेल त्यांनी ती त्वरित भरावी, अन्यथा त्यांच्यावर ही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, संतोष कुमार देशमाने यांनी यापूर्वी देखील कंपन्यांना गंडा घालणे, व्यापाऱ्यांची फसवणूक करणे असे प्रकार केले असल्याची व्यापारी वर्गात चर्चा आहे.

    follow whatsapp