केतकी चितळेला शिवीगाळ, जीवे मारायची धमकी देणाऱ्यांवरही कारवाई करा – चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई तक

• 12:48 PM • 15 May 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या कवितेवर सोशल मीडियातून आणि राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी केतकीच्या पोस्टचा निषेध केला असला तरीही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. न्यायालयाने केतकी चितळेला […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या कवितेवर सोशल मीडियातून आणि राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी केतकीच्या पोस्टचा निषेध केला असला तरीही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्वाची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

न्यायालयाने केतकी चितळेला कोठडी सुनावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकी चितळेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिला शिवीगाळ करणाऱ्या, तिला चोपायची-जीवे मारायची धमकी देणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे यांनी फडणवीस-राज ठाकरेंचे का मानले जाहीर आभार?

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केतकीवर अश्लाघ्य शब्दांत टीका करणाऱ्या युजर्सचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? –

केतकी चितळेने भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली. त्यामधून शरद पवारांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जवळपास १० पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली होती. यावेळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली होती. तसेच तिला आमच्या ताब्यात द्या आम्ही तिला धडा शिकवतो, अशा धमक्या देखील दिल्या होत्या. इतकंच नाहीतर सोशल मीडियावरून देखील केतकीवर टीका करण्यात आली. पोलिसांनी आज केतकीला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ पोस्टबाबत केतकी चितळेचं कोर्टात मोठं विधान, म्हणाली..

    follow whatsapp