भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर दिली माहिती

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आळी आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते. काय […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:18 AM • 30 Dec 2021

follow google news

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आळी आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते.

हे वाचलं का?

काय आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं ट्विट?

आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझीटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हिड टेस्ट करावी आणि काळजी घ्यावी. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. राधाकृष्ण विखे पाटील हे त्या लग्नात विनामास्क दिसले होते. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते.

मास्क कुठेय? तुला पोलिसांना उचलायला सांगू का?; अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी

याआधी राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना कोरोना झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाला. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्या देखील हिवाळी अधिवेशनात हजर होत्या. कालच प्राजक्त तनपुरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी आणि वर्षा गायकवाड यांनीही आपल्या संपर्कात आलेल्या कोरोनाची चाचणी करून चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे.

Varsha Gaikwad : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

मुंबईसह राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही केले. ते म्हणाले, ‘सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.’

    follow whatsapp