Crime News: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एक धक्कादायक घटना समोर आलं आहे. येथे एका 23 वर्षीय महिलेवर 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर संबंधित महिलेने पीडित मुलाला तिच्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणला आणि अल्पवयीन तरुणाने यासाठी नकार दिला असता आरोपी महिलेने त्याला विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर, त्या अल्पवयीन तरुणासोबत तिने 27 ऑगस्ट रोजी मंदिरात जाऊन लग्न केलं.
ADVERTISEMENT
मुलावर लग्नासाठी दबाव आणला
महिलेने मुलावर लग्नासाठी दबाव आणला. तिने तरुणाला धमकावलं आणि नंतर त्याला मंदिरात नेऊन त्याच्यासोबत लग्न केले. पीडित तरुणाचे कुटुंबीय या प्रकारामुळे अतिशय संतप्त झाले. त्यानंतर, हे प्रकरण चाइल्ड लाईनपर्यंत पोहोचलं. बाल कल्याण समितीने घटनेच्या सर्व बाजूंचा आढावा घेतल्यानंतर, मुलीवर कारवाई करण्यासाठी देवरियाच्या एसपींना पत्र लिहिलं.
आत्महत्या करण्याची धमकी...
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी यासंबंधी गुन्हा केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संबंधित महिला अंडरग्राउंड झाली असून अल्पवयीन तरुण त्याच्या घरीच असल्याची माहिती आहे. आरोपी सलेमपुर कोतवाली परिसरातील एका गावात राहत असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी, आरोपी महिला आणि पीडित तरुणाचे प्रेमसंबंध सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुलाच्या घरच्या सदस्यांनी संबंधित महिलेवर अल्पवयीन तरुणाला फसवल्याचा आरोप केला आहे. तसेच, महिलेने बऱ्याचदा धमकावून आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असून तिने आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचं पीडित तरुणाने सांगितलं.
हे ही वाचा: धारावी पाठोपाठ ठाण्यातही अदानी ग्रूपला मोठा विरोध, सिमेंट कपंनीचं नेमकं प्रकरण काय?
मंदिरात जाऊन लग्न...
काही काळापासून आरोपी महिला त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागली. त्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असता अल्पवयीन तरुणाने तिच्यासोबत लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर, दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केलं.
27 ऑगस्ट रोजी भगडा भवानी मंदिरात दोघांचं लग्न झालं. त्यावेळी, दोघांचेही कुटुंबीय तिथे पोहोचले होते. मुलाच्या कुटुंबातील सदस्य या लग्नासाठी नकार देत असताना देखील तरीही मुलीने मुलासोबत लग्नाची सात वचनं घेतली. लग्नानंतर मुलाच्या आईने मुलीला तिच्या घरी घेऊन जाण्यास विरोध केला.
हे ही वाचा: Beed: दाजी जाम चिडला, मेव्हण्याचं हॉटेलच टाकलं जाळून कारण बायको...
मुलाच्या घरच्यांनी केला विरोध
पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या मते, मुलगा अजूनही अल्पवयीन आहे. तो प्रौढ झाल्यावर ते मुलीला त्यांच्या घरी घेऊन जातील. याच कारणावरून घटनास्थळी मोठा वाद झाला. दरम्यान, चाइल्ड लाईनला याबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी चाइल्ड लाईन टीम पोहोचली आणि दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा यांनी कारवाईसाठी देवरियाच्या एसपींना पत्र लिहिले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
