Crime News : एका आंतरराष्ट्रीय शाळेत वरिष्ठांनी एका विद्यार्थ्यावर भयंकर आत्याचार केल्याचे आरोप समोर येऊ लागले आहेत. या अत्याचाराने घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे. काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याशी अक्षरक्ष: वाईट वर्तन केलं. त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत नग्न करून सार्वजनिक ठिकाणी जबरदस्ती नाचण्यास सांगितले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी शाळेतील सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्वांवरच लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आणि पोलिसांनी वसतिगृह वॉर्डनलाही अटक केली. ही घटना कर्नाटकातील बंगळुरूतील असल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सूर्य ग्रह आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांची पाचही बोटं तुपात राहणार
15 वर्षीय विद्यार्थ्याला हँगरने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षीय लहान विद्यार्थ्यावर सहा वसतिगृहातील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी चार दिवस लक्ष्य केले. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आरोपीने पीडिताला छळले आणि मारहाण केली होती. त्यानंतर त्याला सर्वांसमोर नाचण्यास भाग पाडले. पीडिताने जेव्हा नाचण्यास नकार दिला असता, तेव्हा त्याला हँगरने मारहाण केली. दुसऱ्याच दिवशीच्या रात्रीही त्याच्यासोबत असं वाईट कृत्य सुरुच होतं. काही विद्यार्थ्यांनी पीडिताच्या अंगावर थंड पाणी देखील ओतलं.
संबंधित प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडिताने या एकूण घडलेल्या प्रतकरणाची तक्रार दाखल केली होती. परंतु तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. संबंधित प्रकरणात निष्काळजीपणा आणि कारवाई न केल्याने वॉर्डनरला धारेवर धरत अटक करण्यात आली.
हे ही वाचा : Personal Finance: SBI ते HDFC बँकेपर्यंत, सर्वात स्वस्त Home Loan कुठे मिळेल? व्याजदर आणि EMI सगळंच घ्या पाहून!
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता, बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलाचे संरक्षण अर्थातच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारी धमकी आणि लैंगिक अत्याचारासह अनेक गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेसंदर्भातील शाळेतील मुख्याध्यापक चौकशीसाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
ADVERTISEMENT
