सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्श शिंदे यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली

Siddharth Shinde Death : देशातून मन हेलावून अतिशय दुख:द बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे (वय 48) यांचं 15 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लतील एम्स रुग्णालयात निधन झालं.

siddharth shinde passed away

siddharth shinde passed away

मुंबई तक

16 Sep 2025 (अपडेटेड: 28 Sep 2025, 12:10 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मन हेलावून अतिशय दुख:द बातमी समोर

point

सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन

Siddharth Shinde Death : देशातून मन हेलावून टाकणारी अतिशय दुख:द बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे (वय 48) यांचं 15 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लतील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांना सर्वोच्च न्यायालयात असताना चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना एम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. सिद्धार्थ शिंदे हे दुसरे तिसरे कोणीही नसून माजी कृषीमंत्री आण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सूर्य ग्रह आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांची पाचही बोटं तुपात राहणार

राजकारणाचं सखोलपणे ज्ञान

सिद्धार्थ शिंदे हे वकिलीसोबतच राज्यातील राजकारणावर अभ्यास करायचे. त्यांना राजकारणाचं सखोलपणे ज्ञान होतं. त्यांच्या जाण्यानं मोठी हानी निर्माण झाली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असे त्यांचं कुटुंब आहे. सिद्धार्थ शिंदेंचं कुटुंब हे सध्या पुण्यात राहतं. 'मुंबई तक'शी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य देखील केलं होतं.

संविधानाविषयी सखोल ज्ञान

अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकिलीचं काम करत होते. राजकीय घडामोडींपासून ते संविधानावर त्यांना सखोल ज्ञान होते. ते नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी गेले असता, अचानकपणे त्यांना चक्कर आली. तेव्हा तत्काळ त्यांना एमस् रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराच्यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

हे ही वाचा : वसतिगृहात 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला नग्न करत सार्वजनिक ठिकाणी नाचणास भाग पाडलं, नंतर थंड पाणी ओतून... रॅगिंग अजूनही सुरुच?

त्यांच्या निधनाने न्यायालयीन कामकाजाच्या क्षेत्रात मोठी हानी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने आता हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव आता नवी दिल्लीतून 16 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी पुण्याच्या त्यांच्या कुटुंबाच्या राहत्या घरी आणले जाईल. दुपारी 1 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp