अजुनही तुम्ही साडेतीन जिल्ह्यांतच अडकलात, पावसात भिजुनही…शरद पवारांना भाजपने डिवचलं

मुंबई तक

• 07:41 AM • 18 Mar 2022

मी राज्यात पुन्हा भाजपला येऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या शरद पवारांवर भाजपने पुन्हा एकदा डिवचलं आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पवारांनी आपल्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं. या बैठकीत शरद पवारांनी तरुण आमदारांना सल्ला देताना भाजपकडून होणाऱ्या आरोपांमुळे घाबरुन जाऊ नका, मी भाजपला […]

Mumbaitak
follow google news

मी राज्यात पुन्हा भाजपला येऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या शरद पवारांवर भाजपने पुन्हा एकदा डिवचलं आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पवारांनी आपल्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं. या बैठकीत शरद पवारांनी तरुण आमदारांना सल्ला देताना भाजपकडून होणाऱ्या आरोपांमुळे घाबरुन जाऊ नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही असं सांगितल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

शरद पवारांच्या या सल्ल्याचा भाजपने खोचक शब्दांत समाचार घेतला असून आमच्या १०५ जागा निवडणून आल्या…तुम्ही पावसात भिजूनही याच्या निम्म्या जागा निवडून आणू शकला नाहीत अशी टीका केली आहे.

आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपची आता कोल्हापूरवर स्वारी, पोटनिवडणुकीत देणार काँग्रेसला आव्हान

काय म्हणाले होते शरद पवार?

“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, भाजपाकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन अशा गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं देखील पवारांनी यावेळी सांगितलं.

भाजपचंही पवारांना प्रत्युत्तर –

१०५ जागा निवडून आल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचं स्थापन झालेलं सरकार, शरद पवारांनी साताऱ्यात पावसात भिजून केलेलं भाषण या सर्व मुद्द्यांवर भाजपने पवारांवर बोचरी टीका केली आहे.

भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांना राज्यातील तीन प्रलंबित प्रश्नांबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. “आदरणीय शरद पवारजी, भाजपाला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभ्या उभ्या करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण.. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा”, असं भाजपाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेत येऊ न देण्याचा चंग बांधला असला तरीही भाजपने २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या उरलेल्या दोन वर्षांच्या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधकांमधलं द्वंद्व कुठपर्यंत येऊन थांबतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार ! होम पीचवरुन फडणवीसांचं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आव्हान

    follow whatsapp