Solapur मध्ये CM Uddhav Thackeray यांचा पुतळा जाळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

मुंबई तक

• 08:11 AM • 15 Sep 2021

सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी मधे हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीत या पुतळ्याच्या चिंध्या झाल्या. पुतळा जाळण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आधी या पुतळ्याला लाथा मारल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन सुरू असताना […]

Mumbaitak
follow google news

सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी मधे हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीत या पुतळ्याच्या चिंध्या झाल्या. पुतळा जाळण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आधी या पुतळ्याला लाथा मारल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन सुरू असताना ही घटना घडली.

हे वाचलं का?

आंदोलन करणाऱ्या भाजप आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून पुतळा ताब्यात घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये पुतळ्यावरून पकडापकडी झाली.आंदोलनकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अहमदनगरमध्येही आंदोलन

ओबीसींना आरक्षण नकारले असले तरी येणाऱ्या निवडणुकांमधे भाजप ओबीसी जागा लढवून ओबीसी सोबत राहून समासाला न्याय मिळवून देऊ  महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्यामुळे ओबीसीचा आरक्षणाचा हक्क न्यायालयाने नाकरलेला आहे ही सर्व जबाबदारी आघाडी सरकारची आहे सरकारच्या नाकर्तेपणा मुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण नाकरल्याने आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे अहमदनगर भाजपच्या वतीने देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यसरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नागपूरमध्ये आंदोलन

ओबीसी आरक्षणावरून आज नागपुरात भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.नागपुरातील मानेवाडा चौकामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आल, त्यामुळे बराच वेळ मार्गावरची वाहतूक खोळंबली होती.

राज्य सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही सरकार केवळ वेळकाढूपणा हे करत आहेत त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. आता रस्त्यावरच हे आंदोलन आम्ही गल्ली, मोहल्ल्यात घराघरापर्यंत घेऊन जाऊ असे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी यावेळी सांगितले.. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महासचिव आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले..

    follow whatsapp