सर्वसामान्यांना कोव्हिडची लस खासगी रुग्णालय देणार

मुंबई तक

• 08:19 AM • 06 Feb 2021

मुंबई तक : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्यासाठी मुंबई महानगपालिकेतर्फे आता खासगी रुग्णालयाची छाननी सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. लवकरच या खासगी रुग्णालयांची नावं पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात येतील. 16 जानेवारीपासून भारतभर कोव्हिडविरोधात लढण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. याच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्यात येईल. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तक : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्यासाठी मुंबई महानगपालिकेतर्फे आता खासगी रुग्णालयाची छाननी सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. लवकरच या खासगी रुग्णालयांची नावं पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात येतील.

हे वाचलं का?

16 जानेवारीपासून भारतभर कोव्हिडविरोधात लढण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. याच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्यात येईल. सर्वसामान्यांना लस देण्यासाठी खासगी रुग्णालयांची मुंबई महानगरपालिकेतर्फे छाननी सुरू आहे. खासगी रुग्णालयांकडून आलेल्या अर्जांपैकी पहिल्या टप्प्यात 13 रुग्णालयांची एक प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे.

इतर रुग्णालयांच्या अर्जांबाबात विचार सुरू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. याबाबात मुंबई तक शी बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी खासगी रुग्णालयांची छाननी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

सध्या पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लस देण्यासाठी खासगी रुग्णालयांची गरज भासणार आहे. यापूर्वी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितल्यानुसार 1 लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे आणि त्यासाठी खासगी रुग्णालयांची गरज भासणार आहे. लसीकरणासाठी होणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.

सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम सुरू आहे.

    follow whatsapp