Crime news : राज्यातच नाहीतर देशभरात अशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या घटना घडत आहेत. अनेक महिला आपल्या पतीची फसवणूक करत आहेत, नंतर जीवे मारतात. गेल्या काही वर्षात या अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यांना ना पतीची काळजी असते ना मुलांची काळजी असते. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एकाच गावातील दोन तरुणांच्या पत्नीचं बाहेर अनैतिक संबंध होते. संबंधित महिला त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत दागिने आणि पैसे घेऊन फरार झाल्या आहेत. संबंधित महिलांचा शोध घेण्यासाठी पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र, पालकांनी जाब विचारत केला संताप, नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
ग्वाल्हेर जिल्ह्यातील डाबरा येथे काही दिवसांपूर्वी दोन्ही भावांच्या पत्नी एकाच वेळी घरातून पळून गेल्या. त्यापैकी एका महिलेचा पती संतोषने माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील सल व्यक्त केली. तो म्हणाला की, मी आणि माझा धाकटा भाऊ पोटापाण्यासाठी मोलमजुरीचे काम करतो. जेव्हा ते दोघेही मजूरीसाठी जातात तेव्हा दोघांच्याही बायका या प्रेमप्रकरणात कधी अडकल्या हे त्यांनाही कळालं नाही.
11 वर्षांच्या मुलाने सांगितलं की...
परंतु, 28 जून रोजी पळून गेल्यानंतर त्याच्या 11 वर्षांच्या मुलाने सांगितलं की, तुम्ही दोघे कामावर गेल्यानंतर आई आणि काकू दोन तरुणांना घरी बोलावत असतात. मी एकदा पाहिलं होतं, तेव्हा हे कोणाला सांगितलं तर जीवे मारेन अशी धमकी दिली होती. मारहाणीच्या भीतीने मुलाने घरात कसलीच गोष्ट सांगितली नाही. त्यानंतर दोघीही त्यांच्या संबंधित प्रियकरांसोबत पळून गेल्या होत्या.
संतोषने डाब्राच्या पिचोर येथील दोन तरुणांनी त्याच्या पत्नीचे आणि आपल्या वहिनीचे अपहरण केल्याचा आरोप केला. संतोषने दोघींच्याही प्रियकरांची नावे सांगितली आहेत. एकाचं नाव छोटू कुशवाह आणि दुससऱ्याचं नाव अंश कुशवाह असे आहे. त्यांनीच संतोषच्या पत्नीचे आणि वहिनीचं अपहरण केलं.
हेही वाचा : भयंकर! डॉक्टरने नवजात अर्भकाला केलं मृत घोषित, कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची केली तयारी अन् बाळ लागलं रडू
पुढे पीडित संतोषने सांगितलं की, त्याची पत्नी 11 वर्षांच्या मुलाला सोडून पळून गेली. तर त्याच्या धाकट्या भावाची पत्नी तिच्या मुलाला घेऊन पळून गेली. तसेच, दोन्ही महिला घरातून सुमारे 2-3 लाख रोख रक्कम आणि सोने चांदी घेऊन पळून गेल्या. दरम्यान, आता संबंधित प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंत गोयल यांनी सांगितलं की, दोन्ही पतींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही महिलांचा शोध सुरू असून दोन्ही महिला नेमक्या कशा परिस्थिती गायब झाल्या याचा खोलवर तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
