'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना आयकर नोटीस मिळाल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. पण आता शिरसाट यांनी हे वक्तव्य मागे घेतले आहे.

श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस

श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस

मुंबई तक

10 Jul 2025 (अपडेटेड: 10 Jul 2025, 08:27 PM)

follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुति आघाडीतील शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज (10 जुलै) विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांनी दावा केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परंतु काही वेळातच शिरसाट यांनी घूमजाव करत हे वक्तव्य चुकीने आपल्या तोंडी घातलं गेलं असं म्हटलं. पण संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले 

हे वाचलं का?

वक्तव्य आणि घूमजाव 

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मला नोटीस आलीए, श्रीकांत शिंदेंना नोटीस आलीए.. आणखी कोणाला नोटीस येत असेल.. तर त्याबाबत आयकर विभागाला उत्तर देणं हे बंधनकारक आहे. आयकर खात्याने 9 तारखेला माझ्याकडे उत्तर मागितलं होतं. पण मी त्यांच्याकडे वेळ वाढवून मागितली आहे.'

या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. शिवसेना सत्तेत असतानाही त्यांच्या मंत्र्यांना आणि खुद्द एकनाथ शिंदेंच्या मुलाला आयकर खात्याची नोटीस आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

हे ही वाचा>> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...

मात्र, काही वेळातच संजय शिरसाट यांनी घूमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "मी श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याबाबत काहीच बोललो नाही. काही पत्रकारांनी मला विचारले की, श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली आहे का? तेव्हा मी सांगितले की, मला याबाबत काही माहिती नाही. माझ्या तोंडी चुकीचे वाक्य घातले गेले."

शिरसाट यांना मिळालेली आयकर खात्याची नोटीस

संजय शिरसाट यांनी स्वतःला आयकर खात्याकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. ही नोटीस त्यांच्या 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये दाखवलेल्या संपत्तीतील वाढीच्या संदर्भात आहे. त्यांनी सांगितले की, आयकर विभागाने त्यांच्या संपत्तीच्या वाढीवर प्रश्न उपस्थित केले असून, त्यासाठी त्यांना 9 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली आहे आणि लवकरच कायदेशीर उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा>> 'मराठीचा माज नाही, गद्दारीची लाज नाही', वैभव जोशींच्या कवितेचं विडंबन... ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं!

संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल 110 कोटी रुपयांच्या बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत, म्हणजेच 67 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आयकर विभागाची नोटीसही याच प्रकरणाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे.

राजकीय परिणाम

या प्रकरणाने महायुती आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. शिरसाट यांनी यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक मोठं विधान केलं होतं. सामाजिक कल्याण विभागाच्या निधी वळविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण आता आयकर नोटीस प्रकरणाने  संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच श्रीकांत शिंदे यांचे नाव या प्रकरणात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदेंची अचानक दिल्लीवारी का?

विशेष म्हणजे, या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीला असल्याचं देखील वृत्त समोर आलं, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. विरोधकांनी अशी टीका केली की, मुलगा श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्यामुळे एकनाथ शिंदेंनी तात्काळ दिल्लीला धाव घेतली.

शिरसाट यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, शिरसाट यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'आयकर विभाग आपले काम करत आहे आणि यात कोणतेही राजकीय षडयंत्र नाही.

    follow whatsapp