सुशांतच्या बहिणाला कोर्टाचा दिलासा नाही, पाहा काय घडलं कोर्टात

विद्या

• 03:23 PM • 15 Feb 2021

मुंबई: मुंबई उच्च न्यायलयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, कोर्टाने सुशांत सिंह राजपूतची लहान बहीण मीतूला मात्र दिलासा दिला आहे. मीतूनच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द केला आहे. पण दुसरी बहीण प्रियंकाला कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. या दोघींविरुद्ध तक्रार अभिनेत्री रिया […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबई उच्च न्यायलयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, कोर्टाने सुशांत सिंह राजपूतची लहान बहीण मीतूला मात्र दिलासा दिला आहे. मीतूनच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द केला आहे. पण दुसरी बहीण प्रियंकाला कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. या दोघींविरुद्ध तक्रार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केली होती.

हे वाचलं का?

कोर्टाने प्रियंकाविरुद्ध दाखल केलेली एफआयआर योग्य ठरवली आहे. कारण कोर्टाला असं वाटतं की, प्रियंका सिंहविरोधात ही प्रायमरी केस आहे. न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाने याबाबत सुनावणी करताना असं म्हटलं आहे की, ‘या निर्णयामुळे तपास अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास आणि रिपोर्ट सादर करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.’

ही बातमी पाहा: सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरला एनसीबीकडून अटक

रियाने सुशांतच्या बहिणींवर काय आरोप केले होते?

7 सप्टेंबर 2020 रोजी अभिनेत्री रियाने मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात फसवणूक आणि सुशांतला प्रतिबंधित औषधं दिल्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला होता. रियाने यावेळी दावा केला होता की, काही डॉक्टरांच्या मदतीने सुशांतच्या बहिणींनी एक कट रचला आणि खोटं प्रिस्क्रिप्शन्स बनवलं आणि कोणत्याही सल्ल्याशिवाय सुशांतला या औषधांचे चुकीचे डोस दिले. ज्यामुळे सुशांतला क्रॉनिक एंग्जाइटीचा अॅटक आला आणि त्याने आत्महत्या केली. दरम्यान, हे प्रकरणाची वांद्रे पोलिसांद्वारे करण्यात आली होती. जी नंतर सीबीआयला ट्रान्सफर करण्यात आली.

दरम्यान, आपली बाजू मांडताना सुशांतची बहिण प्रियंका आणि मीतूने कोर्टाला सांगितलं की, त्यांना भीती आहे की, सीबीआय त्यांना कधीही अटक करु शकते. दरम्यान, एका प्रकरणात दोन एफआयआर होऊ शकत नाहीत म्हणून मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवायला नको होता असे सांगून एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांच्या खटल्याला सीबीआयने पाठिंबा दर्शविला होता. सुशांतच्या बहिणीचा खटला पाहणाऱ्या वकिलाने याबाबत असं म्हटलं आहे की, एफआयआर रद्द व्हावी यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ.

दुसरीकडे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी सुशांतच्या बहिणींना या प्रकरणात दिलासा देण्यास विरोधात केला होता. ते याबाबत असं म्हणाले, ‘आम्ही कोर्टाच्या निर्णयावर संतुष्ट आहोत. रिया चक्रवर्ती ही न्याय मिळावा म्हणून लढत आहे आणि सत्याचा विजय झाला आहे.’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सध्या याप्रकरणी सीबीआय सखोल तपास करीत आहे.

    follow whatsapp