पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली

मुंबई तक

21 Feb 2026 (अपडेटेड: 21 Feb 2026, 08:12 PM)

Pune Crime : चॉकलेटचे आमिष दाखवून एका चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी लोहगड पोलिसांनी कारवाई करत आरोपीला चार तासांत अटक केली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं पुणे शहर हादरून गेले आहे. 

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीला चॉकलेट आणि बिस्कीट देण्याचे आमिष 

point

रेल्वे स्थानकाजवळील अज्ञात स्थळी नेत चिमुरडीवर अत्याचार 

Pune Crime : आदित्य भावार - चॉकलेटचे आमिष दाखवून एका चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी लोहगड पोलिसांनी कारवाई करत आरोपीला चार तासांत अटक केली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं पुणे शहर हादरून गेले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य

चिमुरडीला चॉकलेट आणि बिस्कीट देण्याचे आमिष 

घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत सोलापूरहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ते प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुसऱ्या रेल्वेची वाट बघत थांबले होते. त्याचक्षणी एका अज्ञात व्यक्तीने मुलीशी ओळख केली, नंतर चॉकलेट आणि बिस्कीट देण्याचे आमिष देखील दाखवले. 

रेल्वे स्थानकाजवळील अज्ञात स्थळी नेत चिमुरडीवर अत्याचार 

यानंतर आरोपीने मुलीला रेल्वे स्थानकाजवळील एका अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलगी कुठेही दिसत नसल्याने आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला. काही वेळानंतर मुलगी परतली असता, तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला होता. यानंतर पालकांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : अहिल्यानगर : शाळेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार

या प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळपणे तपासणी करत चक्रे फिरवली. दरम्यान, आरोपीचा शोध घेतला आणि चार तासांमध्ये त्यांना अटक केली, अशी माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक प्रमोद खोपिकर यांनी दिली आहे. या घटनेनं रेल्वे स्थानिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.