मालकीण बाईचा नोकरावर जीव जडला, लागलीच विवाह उरकला, पण शेवटी डोक्याला हात लावायची वेळ 

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरल या एका आयटी कंपनीच्या मालक आहेत. त्यांनी नरसिंहपूर गावातील मनोज नायक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मनोज त्यांच्या कंपनीत काम करत होता आणि त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:31 PM • 21 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मालकीण बाईचा नोकरावर जीव जडला, लागलीच विवाह उरकला

point

पण शेवटी डोक्याला हात लावायची वेळ 

Crime News : गुजरातमधील एका महिलेने पतीविरुद्ध कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ ओडिशातील पोलीस ठाण्यात फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी भद्रक जिल्हा येथे घडली.

हे वाचलं का?

अहमदाबाद येथील निरल मोदी यांनी बोंथ पोलीस स्टेशन येथे जाऊन फिनाइल प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पतीवर पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरल या एका आयटी कंपनीच्या मालक आहेत. त्यांनी नरसिंहपूर गावातील मनोज नायक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मनोज त्यांच्या कंपनीत काम करत होता आणि त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

लग्नानंतर मनोजने निरल यांना आपल्या गावी व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप आहे. व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी निरल यांनी स्वतःचे घर आणि कंपनीची मालमत्ता गहाण ठेवून सुमारे 5 कोटी रुपये कर्ज घेतले.

हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केवळ 10 ते 20 रुपयांत चहा आणि बरंच काही... प्रवाशांना दिलासा

मात्र, मनोज नायकने हे पैसे घेऊन निरल आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून फरार झाल्याचा आरोप आहे. यानंतर निरल यांनी अधिकाऱ्यांकडे पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

 “तक्रार असूनही कारवाई नाही”

निरल यांच्या भावाने सांगितले की, तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही. “माझी बहीण गेल्या तीन महिन्यांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहे. मात्र तपासात कोणतीही विशेष प्रगती झालेली नाही,” असे त्यांनी म्हटले.

भावाच्या म्हणण्यानुसार, आपल्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी निरल यांनी संतापाच्या भरात फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. “आम्हाला न्याय हवा असून मनोज नायकविरुद्ध तात्काळ कारवाई व्हावी,” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

आरोपीचा शोध सुरू

श्रीबल्लव साहू, प्रभारी निरीक्षक, बोंथ पोलीस स्टेशन यांनी सांगितले की, मनोज नायक अद्याप सापडलेला नाही. “एका निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षकांसह पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. राउरकेला, संबलपूर आणि बरहामपूरसह अनेक ठिकाणी तपास करण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत


 

    follow whatsapp