संशय घेणं महागात! आधी नवऱ्याची आत्महत्या अन् मग पोलिसांच्या समोरच बायकोनं स्वत:ला संपवलं, हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : एका प्रेमी युगुलाच्या संसाराचा अत्यंत धक्कादायक आणि करुण अंत झाला आहे. 28 वर्षीय अमरजीत याने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून हादरलेल्या 24 वर्षीय पत्नी रेखा सोनकर हिनेही पोलिसांच्या समोरच इमारतीच्या पिलरला दोरी बांधून आपले जीवन संपवले. या दुहेरी आत्महत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

crime news

crime news

मुंबई तक

• 11:09 AM • 21 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

संशय घेणं महागात!

point

आधी नवऱ्याची आत्महत्या अन् मग पोलिसांच्या समोरच बायकोनं स्वत:ला संपवलं

Crime News : निव्वळ संशयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाच्या संसाराचा अत्यंत धक्कादायक आणि करुण अंत झाला आहे. 28 वर्षीय अमरजीत याने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून हादरलेल्या 24 वर्षीय पत्नी रेखा सोनकर हिनेही पोलिसांच्या समोरच इमारतीच्या पिलरला दोरी बांधून आपले जीवन संपवले. या दुहेरी आत्महत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड: ब्युटीपार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गरोदर; पीडितेच्या अपहरणकर्त्यास अटक

2025 मध्ये आंतरजातीय विवाह

अमरजीत आणि रेखा यांनी सप्टेंबर 2025 मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र, दोघांच्या जाती भिन्न असल्याने अमरजीतच्या कुटुंबीयांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. या वादावरून पोलीस ठाण्यात पंचायतही झाली होती, परंतु तोडगा न निघाल्याने दोघांनी गाव सोडले आणि ते कानपूरमध्ये राहू लागले. जानेवारी महिन्यात ते परतले आणि बराती नगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहू लागले. गुरुवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर अमरजीत रागाच्या भरात खोलीबाहेर पडला आणि त्याने बाथरुममधील मफलरच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

पोलिसांसमोरच केली आत्महत्या

रात्री 10 च्या सुमारास जेव्हा रेखा बाथरूममध्ये गेली, तेव्हा तिला पतीचा मृतदेह लटकताना दिसला. तिच्या किंचाळीने इमारतीमधील इतर भाडेकरू जमा झाले. त्यानंतर रेखाने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कोतवाल हेमंत मिश्रा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलीस जेव्हा अमरजीतचा मृतदेह खाली उतरवत होते, त्याच वेळी रेखाने अत्यंत वेगाने कपडे वाळत घालण्याची दोरी पिलरला बांधली आणि गळफास घेतला. पोलिसांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं, 2.5 किलोमीटर दूर नेऊन निर्जनस्थळी अत्याचार

पत्नीच्या चारित्र्यावर संशय

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबाने अमरजीतवर बहिष्कार टाकला होता, ज्यामुळे तो मानसिक तणावात होता. तसेच, गेल्या काही दिवसांपासून अमरजीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याची माहिती समोर आली आहे. सीओ प्रगती यादव यांनी सांगितले की, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या मोबाईल फोन्सची तपासणी केली जात आहे, जेणेकरून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

    follow whatsapp