'कपडे वाळत घाला' बायकोने काम सांगितलं, चवताळलेल्या नवऱ्याने थेट शेवटच केला; नेमकं काय घडलं?

Crime News : नवरा आणि बायको  दोघांनी मिळून घरातील सर्व कामं करायला हवीत. पण या कामामुळेच नवरा आणि बायकोत वाद होऊन बायकोची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बायकोने कपडे धुवून वाळत टाक असं सांगितल्याने नवऱ्याने थेट तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरुषी मानसिकतेतून झालेल्या या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:31 PM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'कपडे वाळत घाला' बायकोनं काम सांगितलं

point

चवताळलेल्या नवऱ्याने थेट शेवटच केला

point

नेमकं काय घडलं?

Crime News : संसाराचा गाडा नवरा आणि बायको दोघांनी एकमेकांच्या सहाय्याने पुढे ढकलायचा असतो. यापैकी एकजणाने जरी हलगर्जीपणा केला तर तो गाडा पुढं सरकत नाही. नवरा आणि बायको  दोघांनी मिळून घरातील सर्व कामं करायला हवीत. पण या कामामुळेच नवरा आणि बायकोत वाद होऊन बायकोची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बायकोने कपडे धुवून वाळत टाक असं सांगितल्याने नवऱ्याने थेट तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरुषी मानसिकतेतून झालेल्या या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगर: 15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार! 5 दिवस जंगलात ठेवलं.. 'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!

गौरवचा खोटारडेपणा उघडकीस

गौरव आणि कविता यांचा विवाह अवघ्या 10 महिन्यांपूर्वी झाला होता. यानंतर सुखी संसार चालू असतानाच वादाची एक ठिणगी पडली.या वादानंतर मंगळवारी (17 फेब्रुवारी) कविताचा मृतदेह घराच्या छतावर संशयास्पद अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला गौरवने बनाव रचत पत्नी अधूनमधून बेशुद्ध पडत असल्याचे सांगून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कविताच्या माहेरच्या लोकांनी हत्येचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कविताचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि गौरवचा खोटारडेपणा उघड झाला. उत्तर प्रदेशातील असमोली परिसरातील ही घटना आहे.

कपडे वाळत घालायला सांगितले, म्हणून...

पोलिस चौकशीत गौरवने दिलेल्या कबुलीने अधिकारीही चक्रावून गेले. घटनेच्या दिवशी कविताने गौरवला कपडे धुवून गच्चीवर नेऊन वाळत घालण्यास सांगितले होते. ही साधी गोष्ट गौरवच्या जिव्हारी लागली. त्यानंतर नशेच्या धुंदीत त्याने गच्चीवर जाऊन कविताचा गळा आवळून तिला संपवले. धक्कादायक म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी कोणताही पश्चात्ताप न दाखवता गावात भरलेल्या जत्रेत फिरण्यासाठी निघून गेला होता.

हे ही वाचा : ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं, कारण समजलं तुम्हीही जाल हादरून!

गौरवच्या वडिलांनाही अटक

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात हुंडाबळी आणि हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा मुख्य आरोपी गौरव आणि त्याला साथ देणारा त्याचा पिता देवेंद्रपाल सिंह या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरु आहे. अवघ्या 10 महिन्यांच्या संसारात अशा प्रकारे संसार संपुष्टात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp