Crime News : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकजण आपल्या मुलाबाळांसह लग्नाला जात आहेत. अशाच एका लग्न समारंभासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसोबत अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका बाजूला लग्न सुरु असताना दुसरीकडे या मुलीवर बलात्कार करण्यात येत होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दुर्घटना लपवण्यासाठी केला मर्डर, नंतर नार्को टेस्टच्या भितीमुळे भावालाच संपवलं, दुहेरी हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
रात्रभर शोध सुरु
पीडित मुलगी आपल्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. लग्नाच्या गडबडीत असतानाच ती काल संध्याकाळपासून अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ मुलगी न दिसल्याने चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही तिचा पत्ता लागत नव्हता. शोध घेत असतानाच गावकऱ्यांना एका घराबाहेर मुलीची चप्पल पडलेली दिसली. यामुळे त्यांचा संशय बळावला.
घरात सापडली मुलगी
कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी जेव्हा त्या घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मुलगी तिथे गंभीर अवस्थेत वेदनेने विव्हळत पडली होती. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच बरुराज पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुख्य आरोपी हरिश्चंद्र साह याला तातडीने अटक केली. पीडितेला तात्काळ उपचारासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हे ही वाचा : दुर्घटना लपवण्यासाठी केला मर्डर, नंतर नार्को टेस्टच्या भितीमुळे भावालाच संपवलं, दुहेरी हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
गावात पोलिस बंदोबस्त तैनात
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. एसडीपीओ सुचित्रा कुमारी यांनी सांगितले की, 15 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली असून, आरोपीला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या पीडितेचा जबाब नोंदवून घेत असून, कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











