Cab driver rapes NEET Student : नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत फसवणूक आणि अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका कॅब ड्रायव्हरने लग्नाचे खोटे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला गरोदर करुन नवजात मुलीसह वाऱ्यावर सोडून दिले. यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आंतराजातीय विवाहाचा राग, भावाने गर्भवती बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला केला, लग्नसमारंभात उडाला गोंधळ
गुंगीचे आश्वासन देऊन बलात्कार
उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील ही घटना आहे. पीडित तरुणी लखनऊच्या गोमतीनगर भागातील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. जुलै 2023 मध्ये तिची ओळख आदित्य यादव नावाच्या कॅब ड्रायव्हरशी झाली. दररोज कोचिंगला येण्या-जाण्याच्या दरम्यान त्यांच्यात संवाद वाढला आणि आदित्यने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा आरोप आहे की, एके दिवशी आरोपीने तिला फसवून खोलीवर नेले आणि चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यावर तिने विरोध केला असता, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिला शांत केले.
मुलीला जन्म आणि आरोपी फरार
काही दिवसांनंतर तरुणी गरोदर असल्याचे समजताच आरोपीने दोन मित्रांच्या उपस्थितीत लग्नाचा बनाव रचला. कुटुंबियांशी ओळख करून देण्याचे टाळत त्याने तिला भाड्याच्या खोलीत ठेवले आणि उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. 2 फेब्रुवारी रोजी पीडितेने एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर आरोपी तीन दिवस तिच्यासोबत पती म्हणून राहिला, मात्र औषधे आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेला तो परतलाच नाही. त्याने आपला फोन बंद केला असून त्याचे मित्रही आता सहकार्य करत नसल्याचे पीडितेने सांगितले आहे.
हे ही वाचा : तरुण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला, नवरा व्हीलचेअरवर... बाहेर येताच मृतदेह आढळला
आरोपीचा शोध सुरु
पीडितेने चिनहट पोलीस ठाण्यासह एसीपी विभूती खंड आणि 18 फेब्रुवारी रोजी जॉइंट सीपी बबलू कुमार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. आरोपीने तिला फोनवर 'तू माझी पत्नी नाहीस, मुलीसह जाऊन मरून जा,' अशी धमकी दिल्याने ती मानसिक धक्क्यात आहे. चिनहट पोलीस ठाण्याचे एसएचओ दिनेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
ADVERTISEMENT











