दुर्घटना लपवण्यासाठी केला मर्डर, नंतर नार्को टेस्टच्या भितीमुळे भावालाच संपवलं, दुहेरी हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?

Crime News : तपासादरम्यान पोलिसांनी सीडीआर आणि बीटीएसचे विश्लेषण केले तसेच गुप्त माहितीच्या आधारे पुरावे गोळा केले. चौकशीदरम्यान मांगीलाल चौधरी याने धक्कादायक कबुली दिली. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने बुटारामचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:33 AM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुर्घटना लपवण्यासाठी केला मर्डर

point

नंतर नार्को टेस्टच्या भितीमुळे भावालाच संपवलं

point

दुहेरी हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?

Crime News Marathi : राजस्थानातील Jalore  जिल्ह्यातल्या ऐलाना गावात घडलेल्या दोन स्वतंत्र खूनप्रकरणांचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या तपासातून उघड झालेली माहिती नातेसंबंधांनाच काळिमा फासणारी ठरली आहे. सख्ख्या भावाच्या मृत्यूप्रकरणात त्याचा भाऊच खुनी असल्याचे समोर आले आहे.

हे वाचलं का?

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेन्द्रसिंह इंदोलिया यांच्या निर्देशानुसार वॉन्टेड गुन्हेगारांना अटक करणे आणि गंभीर गुन्ह्यांचा तातडीने उलगडा करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोटाराम गोदारा आणि सर्कल अधिकारी गौतम जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणाधिकारी मनोज कुमार यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने ऐलाना गावात नोंद असलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.

पहिले प्रकरण 1 जानेवारी 2026 रोजी दाखल झाले. खेकाराम भील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा बुटाराम हा 21 डिसेंबर 2025 पासून बेपत्ता होता. 28 डिसेंबर रोजी तेलवाडा सरहद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मांगीलाल आणि त्याचा भाऊ तेजाराम यांच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा?

दरम्यान, 27 जानेवारी 2026 रोजी तेजाराम चौधरी याचा मृतदेह जुगराज जैन यांच्या शेतातील बेऱ्यावर आढळून आला. त्याच्या शरीरावर गंभीर दुखापतींच्या खुणा होत्या. तेजारामच्या मुलाने बुटारामच्या कुटुंबीयांवर संशय घेत तक्रार दाखल केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी सीडीआर आणि बीटीएसचे विश्लेषण केले तसेच गुप्त माहितीच्या आधारे पुरावे गोळा केले. चौकशीदरम्यान मांगीलाल चौधरी याने धक्कादायक कबुली दिली. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने बुटारामचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. ही घटना अपघाती असली तरी भीतीपोटी त्याने आणि त्याचा भाऊ तेजाराम यांनी मृतदेह तेलवाडा जंगल परिसरात टाकून दिला. यानंतर पोलिसांचा संशय वाढू लागल्याने आणि नार्को टेस्टची भीती वाटू लागल्याने मांगीलालने 26 जानेवारी रोजी उलट्या कुऱ्हाडीने वार करून स्वतःच्या सख्ख्या भावाचा, तेजारामचा खून केला. त्यानंतर हा गुन्हा बुटारामच्या कुटुंबीयांवर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी मांगीलालला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याने आपल्या सख्ख्या मेव्हण्याच्या खुनाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा भोगली होती. या दुहेरी खूनप्रकरणामुळे ऐलाना गावासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सकाळी शिवनेरीवर दर्शन घेतले दुपारी राजा शिवाजीचे पोस्टर लाँच केले, रितेश देशमुखचा नवा चित्रपट कधी येतोय?
 

 

    follow whatsapp