मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला अन् मृतदेह घरातच गाडला; सरकारी शाळेतील शिक्षकाचे भयंकर कृत्य

Crime News : घरगुती वादातून एका शिक्षकाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चक्क घराच्या खोलीतच पुरला. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, नातेवाईकांच्या संशयामुळे या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:28 AM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला अन् मृतदेह घरातच गाडला

point

सरकारी शाळेतील शिक्षकाचे भयंकर कृत्य

Crime News : शिक्षकाने मुलांवर योग्य ते संस्कार करावे, त्यांना माणुसकीचे धडे शिकवावे अशी आपली अपेक्षा असते. मात्र शिक्षक देखील माणूसच असतो. यामुळे शिक्षकाच्या हातूनही गुन्हे घडतात. असाच एका शिक्षकाने केलेला एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. घरगुती वादातून एका शिक्षकाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चक्क घराच्या खोलीतच पुरला. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र नातेवाईकांच्या संशयामुळे या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगर: 15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार! 5 दिवस जंगलात ठेवलं.. 'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!

कुऱ्हाडीने वार करत मृतदेह घरातच पुरला

अंगावर शहारे आणणारी ही घटना उत्तर प्रदेशातील झांसी येथील प्रेमनगर परिसरात घडली आहे. 38 वर्षीय तारिक बेग असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते एके ठिकाणी खाजगी नोकरी करत होते. त्यांचा धाकटा भाऊ मसारिक बेग हा सरकारी शाळेत शिक्षक आहे. 10 फेब्रुवारी रोजी घरात कोणीही नसताना दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात मसारिकने कुऱ्हाडीने तारिकवर सपासप वार केले. यामध्ये त्यांचा जागीत मृत्यू झाला. यानंतर मसारिकने कोणालाही संशय येऊ नये म्हणून खोलीतच सहा फूट खोल खड्डा खणला आणि भावाचा मृतदेह तिथेच गाडून टाकला. मृतदेह लवकर कुजण्यासाठी त्याने त्यावर मीठही टाकले होते.

मामाला आला संशय

घरातील लोक आणि आईने तारिकबद्दल विचारणा केल्यावर मसारिकने बनाव रचला. 15 फेब्रुवारी रोजी त्याने स्वतः प्रेमनगर पोलीस ठाण्यात जाऊन आपला मोठा भाऊ बेपत्ता असल्याची नोंद केली. काही दिवस कुटुंबीय तारिकचा शोध घेत राहिले, परंतु मसारिकच्या वागण्यावरून त्याच्या मामांना संशय आला. त्यांनी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच मसारिकने आपला गुन्हा कबूल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा त्या खोलीतील जमीन खोदून तारिकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हे ही वाचा : कॅब ड्रायव्हरचा NEET विद्यार्थिनीवर बलात्कार, विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला, ड्रायव्हर कुठे लपला?

दोन महिन्यांपूर्वीच लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मसारिकला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात हा वाद मालमत्तेवरून झाला असावा असा संशय आहे, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या भावाने दोन महिन्यांपूर्वीच लग्न केले होते, त्यानेच आपल्या भावाचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर बाजूंचा शोध घेत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

    follow whatsapp