25 वर्षीय सुनेवर सासऱ्याची जबरदस्ती! महिला गाढ झोपेत असताना गुपचूप खोलीत शिरला अन् सकाळी भलतंच दृश्य...

मुंबई तक

• 04:15 PM • 20 Feb 2026

15 फेब्रुवारीच्या रात्री अब्बास लोखंडी तारेच्या साहाय्याने दरवाजाचं लॉक उघडून सुनेच्या खोलीत शिरला. त्यावेळी, पीडिता तिच्या खोलीत गाढ झोपलेली होती. यादरम्यान अब्बासने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर खोलीत भलतंच घडलं.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

25 वर्षीय सुनेवर सासऱ्याने केला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

point

महिला गाढ झोपेत असताना गुपचूप खोलीत शिरला अन् सकाळी भलतंच दृश्य...

Crime News: उत्तर प्रदेशातील शामलीच्या ईस्सोपुर खुरगान गावात एक 25 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिकदृष्ट्या, मृत महिलेचे कुटुंबीय आणि आसपासच्या लोकांना पीडितेने आत्महत्या केली असल्याचं वाटलं. मात्र, संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतलं आणि सत्य घटना उघडकीस आली. 

हे वाचलं का?

मुशकरा असं मृत महिलेचं नाव समोर आलं. संबंधित प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना, पोलिसांना घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद वाटली. पुरावे आणि तिथल्या परिस्थितीवरून असं दिसून आलं की ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असू शकते. पोलिसांच्या तपासादरम्यान, कुटुंबियांमध्ये सुद्धा संशय निर्माण झाला. पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी पीडित मुशकराचे 58 वर्षीय सासरे अब्बास यांना अटक केली. तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

नेमकं प्रकरण काय? 

वृत्तानुसार, अब्बासच्या पत्नीचं निधन झालं असून तो त्याची सून मुशकरा आणि तिच्या मुलांसोबत राहत होता. पीडितेचा पती पंजाबमध्ये मजूरीचं काम करत होता. घरात सून एकटी असल्यामुळे सासऱ्याच्या मनात तिच्याविषयी वासनेची भावना निर्माण झाली. त्यामुळे, त्याने एके दिवशी मुशकराला फूस लावून तिचा आधीचा प्रियकर जावेदला बोलवून घेतलं. खरं तर, सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडायचं आणि त्याच्या आधारे मुशकराला ब्लॅकमेल करून आपल्या घाणेरड्या मागण्या पूर्ण करून घेणे, हाच त्याचा उद्देश होता. 

हे ही वाचा: Govt Job: इस्त्रो (ISRO) मध्ये काम करण्याची संधी! काय आहे पात्रता? अप्लाय करण्याची शेवटची तारीख...

15 फेब्रुवारीच्या रात्री अब्बास लोखंडी तारेच्या साहाय्याने दरवाजाचं लॉक उघडून सुनेच्या खोलीत शिरला. त्यावेळी, पीडिता तिच्या खोलीत गाढ झोपलेली होती. यादरम्यान अब्बासने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सासऱ्याच्या या कृत्याचा महिलेने विरोध केला आणि रागाच्या भरात तिने त्याला लाथ मारली. यामुळे संतापलेल्या अब्बासने थेट सुनेचा गळा दाबून तिची हत्या केली. 

घटनेनंतर, आरोपी खोलीच्या बाहेर आला आणि त्याच तारेच्या मदतीने त्याने खोलीचा दरवाजा आतून लॉक केला. सुनेची हत्या ही आत्महत्या दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी आरोपी स्वत: रडत रडत पोलीस ठाण्यात पोहोचला आणि हुंड्यामुळे सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याची खोटी कहाणी रचली. तसेच, पीडितेच्या माहेरच्या लोकांना सासऱ्याने पोस्टमॉर्टम न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना त्यावर संशय आला. खरं तर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे सत्य उघडकीस आलं आणि कठोर चौकशीनंतर आरोपी अब्बासने आपला गुन्हा कबूल केला.