अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं, 2.5 किलोमीटर दूर नेऊन निर्जनस्थळी अत्याचार

Crime News : पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकलीला काही सामान घेऊन देण्याचा बहाणा करून आपल्या सोबत नेले. तो तिला जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह एका खड्ड्यात पुरून ठेवला.

Mumbai Tak

मुंबई तक

21 Feb 2026 (अपडेटेड: 21 Feb 2026, 08:33 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं

point

2.5 किलोमीटर दूर नेऊन केले अत्याचार

Crime News : गुरुग्राम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने साडेतीन वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकलीला काही सामान घेऊन देण्याचा बहाणा करून आपल्या सोबत नेले. तो तिला जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह एका खड्ड्यात पुरून ठेवला.

या घटनेची सुरुवात गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता झाली. मुलगी घरी परत न आल्याने तिच्या आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती सापडली नाही. रात्री आठ वाजता मुलीचे वडील घरी परतल्यानंतर त्यांनीही परिसरात सुमारे साडेचार तास शोधमोहीम राबवली. तरीही मुलीचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वडिलांनी पोलिसांना फोन करून मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : हिंगोलीत 61 वर्षीय आजीबाईंनी 10 वी चा पेपर सोडवला, वृद्ध महिलेची प्रेरणादायी जिद्द

हरियाणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सेक्टर-37 येथील पोलीस पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली, परंतु सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतरही काही धागादोरा हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. अनेक दुकाने आणि घरांवरील कॅमेरे बंद किंवा खराब अवस्थेत आढळले, ज्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले.

तथापि, रात्री सुमारे पावणे दोनच्या सुमारास दोन ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्या फुटेजमध्ये आरोपी तरुण मुलीला आपल्या सोबत घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. हे फुटेज मुलीच्या कुटुंबीयांना दाखविल्यानंतर संबंधित तरुण हा त्यांचा शेजारी असल्याचे ओळख पटली. त्यानंतर रात्री सुमारे अडीच वाजता पोलिसांनी आरोपीला सेक्टर-37 परिसरातील एका कंपनीतून ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. तपासादरम्यान डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली.

सुरुवातीला आरोपी शिवनाथने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कठोर चौकशी केल्यानंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकला. रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सेक्टर-37 मधील एका निर्जनस्थळी खड्ड्यात पुरलेला मुलीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.

या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेने पुन्हा एकदा समाजातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नागपूर आरटीओ अधिकाऱ्याने युनिफॉर्म परिधान न करताच ड्युटी केली, बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप

    follow whatsapp