बीड- रोहिदास हातागळे: बीडमधून अल्पवयीन तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित तरुणी आई-वडील घरी नसताना ब्युटीपार्लरला जाते, असं सांगून घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. अल्पवयीन पीडिता 12 वीची विद्यार्थीनी असून तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अखेर, पोलिसांनी तिचा तपास घेऊन तिला पळवून नेणाऱ्या तरुणासह ताब्यात घेत तिची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाबाबत धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंधातून अल्पवयीन पीडिता गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील 12 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली पीडिता तिचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाली होती. संबंधित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. त्यामुळे, कुटुंबियांना तिची काळजी वाटू लागली आणि त्यांनी चौकशी केली असता त्या दिवशी ती ब्युटीपार्लरला जात असल्याचं सांगून बाहेर गेली असल्याचं त्यांना समजलं.
हे ही वाचा: अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं, 2.5 किलोमीटर दूर नेऊन निर्जनस्थळी अत्याचार
मुलीच्या वडिलांनी दाखल केली तक्रार
पीडिता बराच वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण तरीही तिचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी, पीडितेच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचं अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार युसुफ वडगाव पोलीस य़ाण्यात दाखल केली. दि. 21 जानेवारी रोजी तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, गु. र. नं. 20/2026 भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) नुसार अज्ञात व्यती विरुद्ध अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: Personal Finance: तुमच्या मुलांच्या या Funds मध्ये करा गुंतवणूक, 5 वर्षांत जबरदस्त पैसा!
शारीरिक संबंधातून अल्पवयीन पीडिता गरोदर
दरम्यान, पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी मुलीचा तपास करून अल्पवयीन पीडितेचा अपहरणकर्ता आरोपी सतीश निवृत्ती उजगरे (रा. पारडी माटेगाव ता. वडवणी) याला ताब्यात घेतलं. नंतर, अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून सतीश उजगरे याच्याविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करणे यासह पॉक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीच्या शारीरिक संबंधातून अल्पवयीन पीडिता गरोदर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT











