सून आणि तिच्या प्रियकराचं सासऱ्याने घडवून आणलं मिलन, पण नंतर केली 'डर्टी डिमांड' अन्...

crime news : सासऱ्याने सुनेकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. सुनेनं याला विरोध केला असता, सासऱ्याने सूनेची हत्या केली. या हत्येमागील खरं रहस्य दाखवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 14 फेब्रुवारी रोजी कैराना पोलीस ठाणे परिसरातील इस्सोपूर खुरगान गावात मुस्कारा नावाच्या महिलेचा मृतदेह तिच्या बंद खोलीत आढळून आला होता. या प्रकरणात सासऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा दावा केला.

crime news

crime news

मुंबई तक

20 Feb 2026 (अपडेटेड: 20 Feb 2026, 08:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

व्हेलेंटाईन डे च्या रात्री, सासऱ्याने सुनेकडे नको त्या मागण्या केल्या

point

सुनेशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी

point

नेमकं काय घडलं?

Crime news : उत्तर प्रदेशातील शामली येथे नातेसंबंधातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कैराना येथे सासऱ्याने सुनेकडे लैंगिकसंबंध ठेवण्याची मागणी केली. सुनेनं याला विरोध केला असता, सासऱ्याने सूनेची हत्या केली. या हत्येमागील खरं रहस्य दाखवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 14 फेब्रुवारी रोजी कैराना पोलीस ठाणे परिसरातील इस्सोपूर खुरगान गावात मुस्कारा नावाच्या महिलेचा मृतदेह तिच्या बंद खोलीत आढळून आला होता. मृत महिलेचे सासरे अब्बास यांनी ही आत्महत्या असल्याचा दावा केला होता, परंतु पोलीस तपासातून भयानक हत्या असल्याचे उघड झाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्रपूर : कारल्याची भाजी बनवल्याचा लेकाला राग, नंतर आईचीच केली निर्घृणपणे हत्या

व्हेलेंटाईन डे च्या रात्री, सासऱ्याने सुनेकडे नको त्या मागण्या केल्या

अब्बास आपल्या सुनेवर लक्ष ठेवून होता, त्याने तिचा विश्वास देखील मिळवला. त्याने सुनेच्या एक्स गर्लफ्रेंडला घरी बोलावण्याची परवानगी दिली होती. व्हेलेंटाईन डे च्या रात्री, सासऱ्याने सूनेकडे नको त्या मागण्या केल्या. त्यानंतर तिने त्या मागण्या नाकारल्या, तेव्हा अब्बासने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. पुरावे लपवण्यासाठी सहभागी असलेल्या त्याच्या मुलाला सलमानलाही पोलिसांनी अटक केली. 

सासऱ्याने सुनेच्या एक्स गर्लफ्रेंडची माहिती मिळवली 

पोलीस तपासातून समोर आले की, अब्बासने मुस्कुरावर वडिलांप्रमाणे प्रेम करण्याचे नाटक करून तिचा विश्वास संपादन केला. गप्पा मारताना तिच्या एक्स बॉयफ्रेंडची माहिती देखील मिळवली. अब्बासने तिचा नवरा परदेशात आहे असे पटवून दिले, याचमुळे सुनेनं प्रियकराला घरी बोलवू लागला. 

सुनेशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी

व्हेलेंटाईन डेच्या रात्री तिचा प्रियकर निघून गेल्यानंतर अब्बासने हुशारीने काठीला तार बांधून खोलीच्या आतील दरवाजा उघडला होता. अब्बास खोलीत गेला असता, त्याने सुनेशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मुस्कुराने जोरदार विरोध करून देखील वासनेनं आंधळ्या झालेल्या सासऱ्याने तिचा गळा दाबून संपवलं. 

हे ही वाचा : हिंगोलीत 61 वर्षीय आजीबाईंनी 10 वी चा पेपर सोडवला, वृद्ध महिलेची प्रेरणादायी जिद्द

हत्येनंतर अब्बासने मुलगा सलमानला फोन करून सांगितले की, प्रेमसंबंध आहेत. हे प्रकरण लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक कट रचला. सकाळी अब्बासने दावा केला की, त्याच्या सुनेने स्वत:ला एका खोलीत कोंड़ून घेत आत्महत्या केली. त्याने पोलीस आणि कुटुंबावर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी दबाव आणला. 

    follow whatsapp