Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांसाठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत केटरिंग सुविधा पुरवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी 'उडान यात्री कॅफे'चं ई-उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे, मुंबई विमानतळ आता देशभरातील विमानतळांसारख्या प्रवाशांना परवडणाऱ्या आणि सुलभ सुविधा प्रदान करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
फक्त 10 ते 20 रुपयांमध्ये खाण्याचे पदार्थ...
हे कॅफे टर्मिनल 2 (T2) च्या डिपार्चर एरियामध्ये चेक-इन एरियामधील गेट 1 आणि 2 च्या दरम्यान उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी प्रवाशांना चहा, कॉफी, पॅकेज्ड पाणी, स्नॅक्स आणि डेजर्ट म्हणजेच मिष्ठान्न यासारख्या वस्तू फक्त 10 ते 20 रुपयांमध्ये अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळतील. वाढत्या महागाईत विमानतळावरील ही सुविधा प्रवाशांसाठी दिलासाजनक मानली जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती! पगार तर... कुठे आणि कधीपर्यंत कराल अर्ज?
परवडणाऱ्या दरात दर्जेदार खाद्यपदार्थ
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई प्रवास अधिक समावेशक बनवणे आणि सर्व प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार खाण्याचे पदार्थ उपलब्ध करून देणे, हे 'उडान यात्री कॅफे'चे उद्दिष्ट आहे. ई-उद्घाटन झाल्यानंतर हे कॅफे 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रवाशांसाठी औपचारिकदृष्ट्या खुले करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर आधीच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्याचे ब्रँड आहेत, परंतु हे नवीन कॅफे विशेषतः परवडणाऱ्या दरात सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. यामुळे विमानतळावरील फूड अँड बेव्हरेच म्हणजेच अन्न आणि पेय पोर्टफोलिओ आणखी मजबूत होईल तसेच प्रवाशांच्या अनुभवात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT











