Rohit Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
ADVERTISEMENT
रोहित पवार म्हणाले की, या विमान अपघाताबाबत त्यांनी स्वतःच्या पातळीवर चौकशी केली असून त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान ज्या VSR Ventures Private Limited कंपनीचे होते, त्या कंपनीला मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींकडून वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, VSR कंपनीशी संबंधित काही व्यक्ती सत्ताधारी वर्तुळात आहेत. काही जण राज्य पातळीवर तर काही जण केंद्रात सत्तेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संबंधित आहेत. “जर कोणी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तोही या कटाचा भाग आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मधील काही अधिकारीही कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
“या प्रकरणात जर अजित पवार यांना न्याय मिळवून देऊ शकतील, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहच आहेत.” त्यांनी दोघांनाही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहन केले असून पंतप्रधानांना ईमेलद्वारे पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा प्रमुख्याने उपस्थित करावा, अशी मागणी रोहित पवार केली.
हेही वाचा : बीड: ब्युटीपार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गरोदर; पीडितेच्या अपहरणकर्त्यास अटक
तांत्रिक बाबींवरही उपस्थित केले प्रश्न
रोहित पवार यांनी अपघाताच्या तांत्रिक बाबींवरही प्रश्न उपस्थित केले. अपघाताच्या वेळी विमानात एक नव्हे तर अनेक स्फोट झाले, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ‘ब्लॅक बॉक्स’ संदर्भातही शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विमानात यांत्रिक आणि देखभालीसंबंधी गंभीर त्रुटी होत्या, असा रोहित पवारांनी केला.
याशिवाय प्रवाशांच्या सामानासाठी असलेल्या जागेत अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते. त्यातूनच आग लागून हा भीषण अपघात झाला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, जेणेकरून अजित पवार यांना न्याय मिळू शकेल, अशी त्यांची मागणी आहे.
28 जानेवारी रोजी झाला होता अपघात
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान दुर्घटनेत निधन झाले होते. हा अपघात त्यांच्या बारामती येथे लँडिंगदरम्यान झाला. दुर्घटनाग्रस्त विमान हे Learjet 45 (नोंदणी क्रमांक VT-SSK) प्रकारातील होते आणि ते दिल्लीस्थित VSR Ventures Private Limited या कंपनीद्वारे संचलित केले जात होते. ही चार्टर फ्लाइट मुंबईहून बारामतीकडे जात होती.
या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. यात मुख्य वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, केबिन क्रू पिंकी माळी आणि त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचा समावेश होता. सकाळी सुमारे 8.30 ते 8.45 च्या सुमारास बारामती एअरstripपासून काही मीटर अंतरावर लँडिंगदरम्यान हे विमान कोसळले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











