12 वर्षातील सर्वात मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा, केंद्र सरकारला मोठा झटका

मुंबई तक

25 Jul 2026 (अपडेटेड: 25 Jul 2026, 05:01 PM)

Dharmendra pradhan resign : सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर येत असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेनं दिल्लीत मोठी घडामोडा निर्माण झाली आहे. 

Dharmendra Pradhan Resignation

Dharmendra Pradhan Resignation

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत मोठ्या घडामोडी

point

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

Dharmendra Pradhan Resignation : सध्याची मोठी बातमी समोर येत असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेनं दिल्लीत मोठी घडामोड निर्माण झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं बळ मिळालं, मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी 'X' वर ट्विट करत राजीनाम्याची माहिती दिली. 

हे वाचलं का?

काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान? 

राजीनाम्यात त्यांनी म्हटलं की, "गेल्या 4 दशकांपर्यंतच्या अधिककाळात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी मी समर्पितच राहिले आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेल्या  शिक्षण व्यवस्थेत राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीचाच विश्वास राहिलेला आहे. 

"देशातील आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरूण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजित जीवनाचा नैतिक संकप्ल राहिलेला आहे. तसेच पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मला जी काम करण्याची संधी मिळाली. त्याचा मी आभारी आहे", असं त्यांनी पोस्ट करत माहिती दिली. 

हे ही वाचा : राजीनामा होताच दीपकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, प्रधान यांचं नाव घेत थेट...

'मुलांनी अभ्यासात वेळ घालवावा'

यापुढं त्यांनी लिहिलं की, 'गेल्या 10 दिवसांतील घडामोडी पाहून माझे मन दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे. देशाच्या या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी आणि भारताच्या एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींमध्ये अडकू नये, आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासात घालवावा व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे. 

हे ही वाचा : 'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं ट्विट

राष्ट्रसेवेसाठी सदैव समर्पित

'याच सर्व गोष्टींचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांना/प्रधानमंत्र्यांना सुपूर्द केला आहे. मी आदरणीय प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे, मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी, आणि ज्या सर्वांसोबत मला काम करण्याचे भाग्य लाभले, त्या सर्वांचेही मी आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी तिच्यासाठी सदैव समर्पित राहीन.' असं प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.