Crime News: उत्तर प्रदेशातील झाशीच्या पुनावली कला गावात पती आणि पत्नीमधील कौटुंबिक वादाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वृत्तानुसार, केवळ 20 तासांत दोघांचा मृत्यू झाला. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर, संबंधित महिलेने पतीसोबत झालेल्या वादातून फाशी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर, पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला. आरोप आणि मानसिक आघाताच्या दरम्यान, पती देखील बेपत्ता झाला आणि रात्री उशिरा त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला होता? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
नवरा-बायकोच्या वादाचं नेमकं कारण
मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय मनोज अहिरवार हे त्यांची 35 वर्षीय पत्नी वंदना आणि देवांश (12), राधिका (10) आणि ऋषभ (7) या तीन मुलांसोबत राहत होते. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात काम करत होते. सुमारे 20 दिवसांपूर्वी मनोजने त्याच्या पत्नीला फोनवर कोणाशी तरी बोलताना पाहिलं, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ते पुन्हा झाशी येथे आपल्या घरी परतले. त्यावेळी, वंदनाने घरी परतताना ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी मनोजने तिला वाचवलं. मात्र, झाशीला परतल्यानंतरही दोघांमधील भांडणं कमी झालं नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
बुधवारी रात्रीच्या सुमारास, वंदनाच्या मोबाईल फोनमधून काही अॅप्स डिलीट करण्यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की वंदना तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद केला. बराच वेळ आतून कोणताही आवाज न आल्याने मुले आणि कुटुंबातील सदस्य दरवाजा तोडून खोलीत गेले, परंतु त्यांना पीडिता फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर, कुटुंबियांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केवळ 10 ते 20 रुपयांत चहा आणि बरंच काही... प्रवाशांना दिलासा
टॉवेलने फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
पत्नीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या मनोजने त्याच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी आणि पोलिसांनी त्याला वाचवलं. तो त्याच्या पत्नीच्या पोस्टमॉर्टमच्या वेळी मेडिकल कॉलेजमध्ये गेला होता, परंतु त्यानंतर तो अचानक गायब झाला. तो तिच्या अंत्यसंस्काराला सुद्धा उपस्थित राहिला नाही. गुरुवारी रात्री ग्रीन होम सिटीजवळील झुडुपात टॉवेलने फाशी घेतलेल्या अवस्थेत मनोजचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा: अहिल्यानगर : शाळेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार
घटनेनंतर, वंदनाच्या काकांनी आरोप केला की ही आत्महत्या नसून खून आहे. ते म्हणाले की मनोज त्यांचं लग्न झाल्यापासून भाचीला त्रास देत होता. दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा आणि तिच्याकडे पैशांची मागणी करायचा. याप्रकरणी त्यांनी दावा केला की गेल्या 10 वर्षांपासून वंदनाचा छळ होत होता. तसेच, त्यांनी वंदनाच्या शरीरावर अनेक वेळा जखमा पाहिल्या आहेत आणि या घटनेची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT











